चिनावल अल्पसंख्याक निधीतील कामाचे गौडबंगाल! काम न करता १० लाखांची बिले काढली- चौकशीची मागणी !
चिनावल ता.रावेर (प्रतिनिधी)। चिनावल तालुका रावेर येथील अल्पसंख्यांक निधीतून मंजूर पेव्हर ब्लॉक बसवण्याच्या कामात मोठे गौडबंगाल झाल्याची चर्चा चीनावल व ग्रामपंचायत प्रशासन तसेच आजी माजी व सदस्यांच्या चर्चेवरून सिद्ध होत आहे
अल्पसंख्याक निधी तून मंजूर असलेले काम ज्या ठिकाणी करावयाचे आहे तेथे आजपावेतो प्रत्यक्षात काम झालेले नाही या ठिकाणी खा.रक्षाखडसे यांनी भूमीपूजन ही केले होते मात्र काम न करताच सदर कामाचे १० लाख रुपयांचे बिले सुध्दा काढले गेल्याचे विश्र्वसनीय वृत्त आहे. सदर काम हे संबंधित विभागाचे अभियंता शेख यांच्या अंडर झालेले आहे सदर कामाचे भूमिपूजन होवून काम सदर जागेवर न झाल्याने सदर परिसरातील नागरिक या बाबत ग्रामपंचायत व लोकप्रतिनिधींना या बाबत विचारणा करीत असल्याने संबंधितांनी या बाबत तपास केला असता ही बाब समोर आली आहे व खासदार रक्षा ताई यांनी संबंधित अधिकारी यांना कामाबाबत सूचना दिली असता अधिकारी व संबंधित ठेकेदार यांनी 10 लाख रुपयाचे बिले ग्रामपंचायतीची कोणतीही परवानगी , ताबापावती ,देखभाल दुरुस्ती किंवा नाहरकत दाखला न घेता परस्पर निधी लाटण्याचा प्रकार चिनावल गावात झाला आहे तसेच त्या भागातील ग्रामस्थांनी आमचा रास्ता चोरी झाल्याची तक्रार केलेली आहे व संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांचे कडून पैसे वसूल करण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांकडुन केली जात आहे.