तीन अपत्य प्रकरणी चिनवाल ग्रामपंचायत सदस्य अपात्र !
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
चिनावाल, ता.रावेर मंडे टू मंडे वृत्तसेवा : येथिल मागील ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या तब्बुसुमबी शे. अजमल या ग्रामपंचायत सदस्यास तीन अपत्य असल्याचे सिद्ध झाल्याने शुभांगी भारदे उपजिल्हाधिकारी जळगांव यांनी आदेश काढत सदस्यत्व रद्द केले आहे.
उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे जिल्हाधिकारी कार्यालय जळगांव यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, विवाद अर्जदार परेश मुकुंदा महाजन यांचा अर्ज मंजूर करण्यात येत आहे. व तब्बुसुमबी शे. अजमल यांना दिनांक 12/09/2001 नंतर 3 अपत्ये झाले असल्याचे सिध्द होत असल्याने सामनेवाले तब्बुसुमबी शे .अजमल यांना आदेशाच्या दिनांकापासून महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 चे कलम 14 ( ज -1 ) नुसार चिनावल , ता. रावेर , जि.जळगाव या ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून पुढे चालु राहण्यास अपात्र घोषित करणेत येत आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 चे कलम 14 ( ज -1 ) नुसार विवाद निकालाचे सुचनापत्र प्रकरणी दिनांक 30/09/2021 रोजी खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात आला आहे. असे निकालात म्हटले आहे.