भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेर

” सस्ता आटा, महेंगा डाटा ” खिर्डी परिसरात मोबाईल नेटवर्क मिळत नसल्याने नागरिकांचे हाल

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

खिर्डी ता.रावेर(प्रतिनिधी):-  मोबाईल कंपन्याचे मासिक, द्वीमासिक, त्रैमासिक, वार्षिक,अर्ध वार्षिक,अशा प्रकारचे रिचार्ज प्लॅन असून हे प्लॅन ४००-५०० रुपयाच्या वरच किमतीचे असून ही सेवा वेळोवेळी रेंज गायब होत असल्याने इतके रुपये देऊनही मिळत नसल्याने रावेर तालुक्यातील खिर्डी परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत.

रावेर तालुक्यातील खिर्डी खु.येथे नवीन गावठाण परिसरात इंडस कंपनीचा मनोरा उभा असून त्या ठिकाणी विविध मोबाईल कंपन्यांची नेटवर्क प्रोव्हायडर यंत्रणा बसवलेली असल्याने सध्या गेल्या अनेक दिवसांपासून मोबाईल चे नेटवर्क गायब होते तर कधी फोन वर बोलणे सुरू असताना मध्येच कॉल डिस्कनेक्ट होणे 4g इंटरनेट सुविधा उपलब्ध  असल्यावर सुद्धा स्लो स्पीड इंटरनेट ब्राउझिंग  होत असल्याने मोबाईल धारकांना फोन पे, भीम ॲप सारखे  नवीन पेमेंट ऑप्शन चा जास्तीत जास्त लोक फायदा घेत असून अनेक वेळा स्लो इंटरनेट मुळे युपीआय द्वारे पैशाची देवाण घेवाण करण्यात अडचणी निर्माण होतात.या सर्व मोबाईल कंपनीच्या ग्राहकांना याचा नाहक मनस्ताप सहन करावा लागतो.तसेच आजू बाजूच्या गावातील नागरिकांना व शाळकरी मुलांना वेगवेगळ्या प्रकारचे शासकीय दाखले लागत असतात सर्व्हर डाऊन असल्याने,किंवा स्लो स्पीड इंटरनेट मुळे ऑनलाईन च्या जगात ऑफलाईन काम करण्यास कोणीही तयार नसल्याने नागरिकांच्या अडचणीत आणखी जास्त भर पडते.मोबाईल ही खेड्या पासून ते शहरापर्यंत अगदी  जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. हल्ली मोबाईल विना जगणे खूप अवघड आहे.या काळात तर सर्वांकडे मोबाईल असतोच मात्र नागरिक त्यांच्या सोयी प्रमाणे विविध मोबाईल कंपन्यांचे सिमकार्ड वापरत आहे.
         

मोबाईल कंपन्यांच्या सदोष सेवेमुळे ग्राहक अतिशय त्रस्त आहेत प्रत्येक मोबाईल धारकांना नेटवर्क विषयी काही न काही समस्यांचा सामना करावा लागतोय.  सस्ता आटा,महेंगा डाटा , असे म्हण्याची वेळ आली आहे.मोबाईल कंपन्याचे मासिक, द्वीमासिक, त्रैमासिक, वार्षिक,अर्ध वार्षिक,अशा प्रकारचे रिचार्ज प्लॅन उपलब्ध असून मोबाईल धारक आपल्या वापरा प्रमाणे हल्ली मासिक, व त्रैमासिक रिचार्ज करत असल्याने 400ते500रुपये पर्यंत किमती असून देखील रिचार्ज विकत घेतात परंतु त्यांना नेटवर्क गायब होण्याच्या समस्या भेडसावत असून मोबाईल धारकांना त्याचा पुरेपूर फायदा होत नसल्याने नाहक आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. संबधित कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तातडीने  अंमलबजावणी करावी अशी मागणी मोबाईल धारकाकडून होत आहे.                                                         

नवीन गावठाण मध्ये अगदी घराजवळच टॉवर असून देखील फोन न लागणे, मध्येच कॉल डिस्कनेक्ट होणे तसेच  इंटरनेट सर्फिंग करताना स्लो स्पीड इंटरनेट मुळे महत्वपूर्ण  माहिती डाऊन लोड होत नाही द्वी मासिक रिचार्ज केलेला असून त्याचा काही एक फायदा होत नाही.लवकरात लवकर ही समस्या सोडविण्यात यावी– संजय कोचुरे  खिर्डी खु एअरटेल सिम ग्राहक.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!