भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरसामाजिक

स्वच्छता म्हणजे रोजचा सण,
नाहीतर कायमचे आजारपण– केसरीनंदन प्रतिष्ठान

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

रावेर,मंडे टू मंडे वृत्तसेवा। रावेर येथील केसरी नंदन प्रतिष्ठान यांच्या अंतर्गत रावेर शहर परिसरात गणेश उत्सवाचे औचित्य साधून निर्माल्य संकलन अभियान राबविण्यात आले.नगरातील प्रत्येक भागातील मंडळाना तसेच घरगुती निर्माल्य संकलनाचे आवाहन करण्यात आले होते.यासाठी प्रत्येक मंडळा ठिकाणी बॅनर लावून जनजागृती करण्यात आली होती. उत्स्फूर्तपणे शहरातील प्रत्येक नागरिकांनी त्यांचा मोलाचा हातभार या निर्माल्य संकलन अभियानाला लावून पर्यावरण स्वच्छता राखण्यास हातभार लावला , सर्व नागरिकांचे प्रतिष्ठान तर्फे आभार मानण्यात आले. ह्याच प्रकारे नवरात्रीच्या वेळी पण हा उपक्रम राबवण्यात येणार असून दुर्गा उत्सव मंडळांनी मदत करावी.या प्रसंगी प्रतिष्ठान चे कार्यकर्ते संदीप महाजन,चेतन इंगळे,पंकज महाजन,पवन दाणी, चंद्रकांत राऊत सर,चेतन सोनार,मोनू महाजन,गौरव शिंदे,विकास अमोदकर,चंद्रकांत इंगळे,जिवन महाजन,महेश गडे,जयेश शिंदे,चेतन पाटील,जयेश पाटील उपस्थीत होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!