पत्नीला मित्रासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहून पतीने केले पत्नीला ठार : रावेर तालुक्यातील पाल येथील घटना
मंडे टू मंडे वृत्तसंकलंन।
रावेर, प्रतिनिधी| तालुक्यातील पाल परिसरातील बर्डीपुरा भागात तारखेला दुपारी मित्रांसोबत पत्नीला आक्षेपार्ह अवस्थेत पाहून संतप्त पतीने पत्नीला लाकडी दंडग्याने मारहाण करून पत्नीची हत्या केल्याची घटना आज उघडकीस आली. आज या घटनेचा खुलासा झाल्यामुळे पाल गावात खळबळ उडाली.
याबाबत सविस्तर माहिती अशी, मयत महिला सायजाबाई साधू बरेला (वय-३० वर्षे रा. बर्डीपुरा, पाल) आणि पती मानसिंग बरेला (वय- ३५ वर्षे रहिवासी बर्डीपुरा, पाल) पतीचा मित्र भायला भंगा बारेला (पिंपलखोरा तहसील जिल्हा. खंडवा) हे दोघी आरोपी पतीच्या घरी दारू पित होते, या महिलेच्या पतीला त्याच्या मित्राने दारू आणण्यासाठी पैसे देऊन बाहेर पाठविले त्यांच्या मुलीला २० रुपये देऊन दुकानात चॉकलेटसाठी पाठविले त्यानंतर दारू घेऊन आलेल्या पतीला मित्र भाया बरेला आणि पत्नी सायजाबाई आक्षेपार्ह अवस्थेत दिसले
पतीला बघून भाया बरेला घटनास्थळावरून पळ काढला त्यामुळे संतापलेल्या पतीने पत्नीला हाताने आणि लाकडी दांडक्याने, तिच्या मानेवर आणि मारहाण करून पत्नीची हत्या केली. आक्षेपार्ह अवस्थेत पाहून पतीने मारहाण केल्याने महिलेचा मृत्यू झाल्याचे पोलीसानी माध्यमांना सांगितले. पळून गेलेला आरोपी भायला बारेला याला पोलिसांनी पिंपलखुटा ( ता.जि. खांडवा , मध्य प्रदेश ) येथे जाऊन अटक केली आहे, या प्रकरणात मयताच्या वडील चमार दलसिंग बरेला रहिवासी गारबर्डी यांच्या फिर्यादीवरून रावेर पोलीस ठाण्यात भादवी कलम 302, 376, 452 अन्वये गुन्हा नोंदवून आरोपींना अटक करण्यात आली आहे.