Video स्टिंग ऑपरेशन : महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेवर जुगार सम्राटाचे साम्राज्य भक्कम : अड्ड्यावर दररोज लाखोंची उलाढाल ! पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न चिन्ह ?
पत्ता जुगाराचा बाजार कसा रंगलाय, याची कल्पना व्हिडिओत दिसणाऱ्या दृश्यावरून येईल…
मंडे टू मंडे, विशेष प्रतिनिधी : कायद्याचे राज्य आहे किंवा नाही, अशी परिस्थिती दाखविणारे चित्र रावेर तालुक्यातील महाराष्ट्र -मध्यप्रदेश सीमेवरील चोरवड/खानापूरच्या दरम्यान असलेल्या नागोळी नदीच्या बाजूला दिसून आले कायदा धाब्यावर बसवून पत्ता जुगाराचे अड्डे कसे खुलेआम सुरू आहेत, हेच आम्ही तुम्हाला दाखवतोय… चोरवड/खानापूरच्या दरम्यान असलेल्या नागोळी नदीच्या बाजूला मंडे टू मंडे न्युजच्या टीमने या जुगार अड्ड्यावर जाऊन खास स्टिंग ऑपरेशन केलं.
येथे पत्याच्या मोठा क्लब (जुगार ) असून येथे जोमाने जुगार सुरू आहे. पोलिसांची किंवा कायद्याची कसलीही तमा न बाळगता, जुगाराचे खेळ सुरू आहे…या ठिकाणी लाखो रुपयांचा जुगाराचा खेळ खेळला जातो. येथे जुगार खेळणाऱ्यांची जत्राच भरलेली असल्याचे मंडे टू मंडे न्युजने परिसरात केलेल्या ह्यस्टिंग ऑपरेशनह्णदरम्यान बघावयास मिळाले. परिसरात शेतशिवारात झाडाझुडुपांच्या आश्रयाने जुगाराचे डाव रंगतात. या जुगाराच्या क्लबला काही राजकीय पुढाऱ्यांचे पाठबळ असल्याचे बोलले जाते. आम्ही या एकाच अड्ड्याचं स्टिंग ऑपरेशन केलं… पण जिल्ह्यासह रावेर तालुक्यात आणखी बऱ्याच ठिकाणी असे पत्ता जुगाराचे अड्डे खुलेआम सुरू आहेत.
नागोळी नदीच्या बाजूला चालणाऱ्या क्लबवर दररोज लाखो रुपयांचा जुगार खेळला जात असून या शिवारामध्ये जुगाराचे चांगलेच पीक आले आहे. याच जुगाराच्या क्लब वर या पूर्वी अनोळखी पाच ते सहा व्यक्तीनी दोन वेळा दरोडा टाकुन जुगाराच्या अड्ड्यावर लूट केली होती व त्यांचे जवळ हत्यारे सुद्धा होते, त्यात काही जुगारी जखमी झाले होते. या अवैध धंद्यावर रावेर पोलिसांचा वचक अजिबात दिसत नाही… कदाचित मटका चालवणाऱ्यांकडून चिरीमिरी देऊन पोलिसांचे हात ओले केले जातात की काय? आणि त्यामुळंच पोलीस या अवैध धंद्यांकडं कानाडोळा करतात की काय? असा सवाल यानिमित्तानं उपस्थित होतोय.
या पत्त्यांच्या क्लबवर मध्यप्रदेशातून जवळ जवळ
150/200/ जूगारि मटका खेळणारे व काही गुंड लोक येत असतात, या पत्त्यांच्या क्लबचे मालक चार ते पाच असून यातील काही रावेर तालुक्यातील तर काही मध्यप्रदेशातील आहेत. या जुगार अड्ड्याला अभय कुणाचे?आर्थिक हितसंबंध कुणाचे? पोलीस आंधळ्य़ाची भूमिका घेत असल्याने या परिसरात खुलेआम पत्ता जुगारासारखे अवैध धंदे सुरू आहेत. अवैध धंद्यांपासून केवळ चोरवड/खानापूरच्या दरम्यानचा परिसरच सुटले नाही तर तालुक्यातही बिनदिक्कतपणे मटका, जुगार खेळला जात आहे. सध्या हा व्यवसाय जोमात सुरू आहे. विशेष म्हणजे त्या त्या भागातील पोलीस अधिकारी, बीट जमादार यांना मॅनेज करून हा व्यवसाय राजरोसपणे चालविला जातो. खुलेआम हा व्यवसाय चालत असल्याने गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असून चोर्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. तालुक्यातील अवैध धंद्यांना थोपविण्याची जबाबदारी पेलण्याचे दिव्य वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समोर आहे.
पोलीस अधून-मधून जुगार अड्ड्यांवर कारवाईचा बडगा उगारल्याचा देखावा करतात. सर्व काही ठरल्याप्रमाणे होत असल्याने पोलीस छाप्यातून किरकोळ रक्कम जप्त करीत प्याद्यांवर कारवाई करण्यात येते; मात्र जुगार अड्डा चालविणारा मुख्य आरोपी मोकळाच राहतो. पोलिसांच्याच कृपाशीर्वादामुळे अवैध धंद्यांना संरक्षण मिळत असल्याचे परिसरातील जुगार अड्ड्याच्या स्टिंग ऑपेशनमुळे पाहायला मिळत आहे. यामुळे आता आयजी पथकाच्या कारवाईची मागणी परीसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.
या अड्ड्यावर मागील काळात भुसावळ व जळगाव येथील तत्कालीन पोलीस अधिकारी यानी रेड करून अंदाजे 90/95 जुगारी व सट्टा वाले वर गुन्हा दाखल करून 50/60 मोटारसायकल जप्त करून कार्यवाही केली होती. अवैध धंद्यांना जिल्ह्यात थारा देणार नसल्याचे वक्तव्य करणारे जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे या जुगारावर काय कारवाई करतात? याकडे आता लक्ष लागले आहे.