भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमरावेर

पोलिस दादांच्या आशीर्वादाने तर नाही ना फोफावला निंभोरा-खिर्डीतील दारु,सट्टा ,जुगार ? अवैध धंद्यांना खुले केलंय रान

निंभोरा पो. स्टे. चे स.पो.नि धुमाळ यांच्या पुढे मोठे आव्हान

खिर्डी ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज विशेष प्रतिनिधी। रावेर तालुक्यातील निंभोरा पोलिस स्टेशन हद्दीत खिर्डीसह परिसरात सट्टा- मटका चांगलाच फोफावत असल्याचे चित्र दिसुन येत आहे.सट्टा घेणाऱ्या पिढी पासुन तर गावातील सट्टा घेणाऱ्यांची संख्या मध्ये जास्त करून तरुण वर्ग उतरताना दिसत आहे.त्या मुळे सट्टा जुगारात मोठी साखळी असल्याचे दिसत असुन सट्टा जुगाराला मोठी तेजी आल्याचे चित्र दिसत आहे.

सविस्तर वृत असे की, सट्टा जुगारामध्ये एका रुपयाला ऐंशी रुपये देणारा हा व्यवसाय लपून छपून चालत होता मात्र सबंधित विभागाच्या आशिर्वादाने “ओपन टू क्लोज ” मध्ये खेळला जाणारा हा एक प्रकारचा जुगार आता अनेकांचे संसार उद्धवस्त करणारा ठरत आहे. गावागावातील चौकात बसून हा सट्टा जुगार व्यवसायाची खुलेआम सट्टापट्टी बनविली जात आहे. यात सट्टा लावणाऱ्यांची संख्या मोठी दिसत असुन सट्ट्याचे आकडे मोबाईलवर पाहावयास मिळत असल्याने तरूणांना सोईचे ठरत असल्याने सट्ट्यातुन पैसे कमावण्याच्या मोहापोटी
तरूण वर्गा मध्ये अनेकांचे संसार उघड्यावर येत आहे.

स्थानिक पोलीस करताय तरी काय?
पंधरा दिवसांपूर्वी ऐन बाजारच्या दिवशी महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाचे भुसावल विभागीय निरिक्षक सुजित कपाटे यांच्या पथकाने देशी दारू च्या दुकानात धाड टाकत 1 लाख 17 हजाराचा माल हस्तगत केला. परंतू स्थानिक पोलिसाना खिर्डी परिसरात सुरू असलेले अवैध धंदे माहीत असून सुद्धा कारवाई करत नाही हे नवलंच ! वेळीच कारवाई केल्या तर तरुण वर्ग अवैध धंद्याचा आहारी जाणार नाही ,खिर्डी तील अवैद्य धंदे बंद करण्यासाठी परत 4-5 वर्षापूर्वी सारख मतदान तर करावे लागणार नाही ना? अशी ग्रामस्थांची मनस्थिती झालेली आहे.

खिर्डी परीसरात अवैध धंद्यांना पोलिसांनी ‘एनओसी’च दिली की काय?
खिर्डी व सभोवतालच्या गावात सट्टा व्यवसायांना ऊत आला आहे. त्यामुळे पोलिस दादांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात निंभोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत २९ गावे असुन या सर्व गावात खुलेआम चालणाऱ्या या अवैध धंद्यावर आळा घालण्यात यावा अशी मागणी नेहमीच होत असते. गेल्या काही दोन ते तीन वर्षात तरुणाईमध्ये वाढत असलेल्या ‘कमी गुंतवणूक करुन जास्त नफा कमवण्याच्या मानसिकतेमुळे’ अवैध धंद्याकडे अनेक तरूणांचा कल वाढला आहे. त्याचाच फायदा घेत गावात अवैध धंद्यात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसत आहे़. अशा धंद्याकडे तरूणांचा वाढलेला कल आणि पोलिस विभागाकडून त्याकडे करण्यात येणारे दुर्लक्ष यामुळे अवैध धंद्यांना जणु काही मोकळे रानच मिळाले आहे. गावातील विविध भागात सुरू असलेल्या या अवैध धंद्यांमुळे आता गावातील अवैध धंद्यांना पोलिसांनी ‘एनओसी’ च दिली की काय? असा प्रश्न सर्वसामान्यांमध्ये उपस्थित केला जात आहे.

बारावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर शहरासह ग्रामीण भागातील तरूण कमी गुंतवणुकीचा व्यवसाय म्हणुन पान ठेला, चहाची टपरी अशा व्यवसायाकडे वळत होते. मात्र, आता कमी गुंतवणुकीत जास्तीत जास्त नफा कमावण्याच्या नांदात दारूविक्री, सट्टा पट्टी, जुगार, मटका अशा अवैध धंद्याकडे त्यांचा कल वळल्याचे दिसून येत आहे. पान ठेला किंवा चहा टपरीच्या माध्यमातून दहा वर्षांत जेवढा पैसा कमावता येणार नाही, तेवढा पैसा अवैध धंद्यात केवळ दोन ते तीन वर्षांत कमावता येतो असा त्यांचा गैरसमज असुन त्यामुळे अधिक पैसा कमावण्याच्या लालसेनेच दारूचा व्यवसाय गृह उद्योग तर सट्टा पट्टी उदरनिर्वाहाचे साधन झाले आहे. तरूणांनी सट्टा पट्टीला स्वत:च्या उदरनिर्वाहाचे साधन बनविले असुन या कडे पोलीस प्रशासन बघ्याची भूमिका घेत असल्याचे चित्र दिसत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!