सहस्रलिंग येथे तूफान हाणामारी : रावेर पोलिसात गुन्हा दाखल
रावेर, मंडे टू मंडे न्युज, वृत्तसेवा : तालुक्यातील सहस्रलिंग येथे घराच्या बाजुला मोटार सायकल लावण्याच्या वाद झाला व या वादातुन तूफान हाणामारी झाली असून याप्रकरणी रावेर पोलिस स्थानकात नऊ जणांन विरुद्ध दंगलीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, तालुक्यातील सहस्रलिंग येथे काल रात्री घराच्या बाजुला मोटर सायकल का लावली ? या कारणा वरुन झालेल्या वादातून तूफान हानामारी झाली. यामुळे सुनिल जाधव (वय-२३) यांच्या फिर्यादी वरुन आरोपी सताब मोहीते, यशवंत मोहीते, हरदेव मोहीते,तिघे रा सहस्त्रलिंग तसेच हजाब मोहीते, शाणु मोहीते, बसुदेव मोहीते रा. लालमाती तसेच सुभाष बेलदार, संतोष बेलदार, संतोष चव्हाण रा. नेपानगर या नऊ जणांविरुध्द दंगलीचा गुन्हा नोंद करण्यात आला असुन पोलिस पुढील तपास करीत आहे.