भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यरावेर

रावेर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना ऑक्सिजन कॉन्सेट्रेटर व ऑक्सिजन बेड,खा.रक्षा खडसे च्या हस्ते लोकार्पण

Monday To Monday NewsNetwork।

रावेर(प्रतिनिधी)। पंचायत समिती रावेर अंतर्गत सर्व सन्माननीय जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सर्व विभाग प्रमुख अधिकारी व कर्मचारी यांच्या माध्यमातून जमा वर्गणीमधून रावेर तालुक्यातील ७ प्राथमिक आरोग्य केंद्रांना ऑक्सिजन कॉन्सेट्रेटर व ऑक्सिजन बेड खासदार रक्षाताई खडसे यांच्या हस्ते लोकार्पण कार्यक्रम पंचायत समिती सभागृहात आयोजित करण्यात आला.

यावेळी प्रमुख उपस्थितीत खासदार रक्षाताई खडसे, आमदार शिरीष चौधरी, जि.प.अध्यक्ष रंजनाताई पाटील, अँड.रोहिणीताई खडसे-खेवलकर, माजी जि.प. सभापती सुरेश धनके, माजी जि.प.उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, भाजप जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, पं.स. सभापती कविताताई कोळी, पं.स. उपसभापती धनश्रीताई सावळे, माजी सभापती जितेंद्र पाटील, माजी उपसभापती पी.के.महाजन, माजी जि.प.सदस्य रमेश पाटील,ता.यु. मो.अध्यक्ष महेंद्र पाटील,ता सरचिटणीस महेश चौधरी गट विकास अधिकारी दिपाली कोतवाल यांच्यासह सर्व सन्माननीय जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सर्व विभाग प्रमुख अधिकारी, कर्मचारी व भारतीय जनता पार्टी चे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!