प्रशासनरावेर

रावेर नायब तहसीलदार- बदली झाली असताना पदभार न सोडल्याने अनेक तर्क-वितर्क

रावेर (प्रतिनिधी)। तात्काळ पदभार सोडण्याचे आदेश असताना रावेर तहसिल विभागातील निवासी नायब तहसिलदार संजय तायडे यांची बदली होऊन वीस दिवस उलटले तरी सुध्दा त्यांनी पदभार न सोडल्याने तर्क-विर्तक लढविले जात आहे.

निवासी नायब तहसीलदार संजय तायडे, रावेर तहसिल विभाग यांची ३१ ऑक्टोबर रोजी भुसावळ तहसील कार्यालयात निवासी नायब तहसिलदार म्हणून बदली आहे. याला आज वीस दिवस उलटले परंतु त्यांनी अजुन सुध्दा पदभार सोडलेला नाही. ते त्याच ठिकाणी कार्यरत असून पदभार न सोडण्याचे गौड बंगाल काय ? अद्याप पर्यंत पदभार का सोडला नाही . यावर प्रश्न चिन्ह उभे राहिले असता, बदली झालेल्या व्यक्तीना तात्काळ सोडण्यात यावे असे आदेश महाराष्ट्र शासनाचे कार्यासन अधिकारी वि. पो. थोरात यांनी काढले होते. परंतु अजुन सुध्दा निवासी नायब तहसीलदार संजय तायडे यांनी पदभार न सोडल्यामुळे अनेक तर्क-वितर्काना उधाण आले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!