अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान : हताश शेतकऱ्यांची विषारी औषध सेवन करून आत्महत्या
रावेर, मंडे टू मंडे वृत्तसेवा: तालुक्यातील कांडवेल येथे अतिवृष्टीमुळे शेतातील पिके जमीनदोस्त झाल्याच्या नैराशातून एका ४५ वर्षीय शेतकऱ्याने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची घटना घडली. निवृत्ती नारायण पाटील (वय ४५) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेने परिसरात एकाच खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक असे कि, मागील काही दिवसापासून झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात शेतीपिकांचे मोठे प्रमाणात नुकसान झाल्याचे पाहायला मिळाले. तसेच रावेर तालुक्यातील कांडवेल येथील निवृत्ती पाटील यांनी आपल्या शेतातील तीन एकरात कपाशीची लागवड केली होती. मात्र, या अतिवृष्टीमुळे शेतातील पिक जमीनदोस्त झाले. यंदाचा हंगामाच वाया गेल्याने पाटील कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली. हताश अवस्थेत असलेल्या शेतकऱ्यास यातून आलेल्या नैराशातून त्यांनी शेतात जाऊन कपाशीवरील फवारणीचे औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना उघडकीला आली आहे. या घटनेने परिसरात एकाच खळबळ उडाली आहे. त्यांच्या पाश्च्यात लहान दोन मुले आहे.