रावेरसामाजिक

बनावट प्रमाणपत्र प्रकरणी दिव्यांग संघटना आक्रमक

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

रावेर (प्रतिनिधी)। दिव्यांग असल्याचे सिव्हिल सर्जन यांचे बनावटी प्रमाणपत्र प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या  आठ ग्रामसेवकांचे प्रयत्न चालू आहे.शासन निर्णयाप्रमाणे जो व्यक्ती शारीरिक दृष्ट्या अंध,अस्थिव्यंग, मूकबधिर, कर्णबधिर,अपघाती अपंग,मंदबुद्धी ई. कोणत्याही प्रकारचा अपंग असेल त्या व्यक्तीने जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मार्फत तपासणी करून आपले अपंग असल्याचे प्रमाणपत्र ऑनलाईन  पडताळणी करून घ्यावी ज्यांनी हे प्रमाणपत्र ऑनलाईन केलेले नसेल त्यांना शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार नाही हा शासन आदेश आहे .

आमची दिव्यांग संघटना मागील दोन वर्षांपासून तालुक्यातील ग्रामीण भागातील व शहरी भागातील सर्व दिव्यांग बांधवांचे प्रमाणपत्र ऑनलाईन करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. तालुक्यातील ८०% दिव्यांगांचे प्रमाणपत्र ऑनलाईन आमच्या संघटनेच्या प्रयत्नांनी आम्ही केले.या प्रकरणी महत्वाचा मुद्दाअसा की शासन दरबारी सेवा करत असलेले रावेर तालुक्यातील आठ ग्रामसेवक हे अपंग आहेत ऑफलाईन प्रमाणपत्रानुसार (६ कर्णबधिर+२ अस्थिव्यंग) त्यांनी त्यांचे अपंग असल्याचे ऑफलाईन प्रमाणपत्राच्या आधारे पाहिजे त्याठिकाणी आपापली बदली करून घेतलेली आहे …..आमच्या दिव्यांग संघटनेचे म्हणणे फक्त एवढे आहे की, आपण खरोखरच जर अपंग आहेत तर जिल्हा वैद्यकीय अधिकारी मार्फत पडताळणी का करत नाही आणि प्रामाणपत्र ऑनलाईन का करत नाही. हा खरोखर दिव्यांग असलेल्या आमच्या दिव्यांग बांधवांवर अन्याय आहे असे संघटनेचे म्हणणे आहे. या विषयी आज मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. जळगाव व तहसीलदार मॅडम रावेर यांना संघटनेच्या वतीने असे निवेदन देण्यात आले की,

रावेर पंचायत समिती अंतर्गत कार्यरत असलेले ग्रामसेवक– १) अरविंद कोलते, २) अनिल वराडे, ३) रवींद्र चौधरी , ४) नितीन महाजन, ५) श्याम पाटील ,६) छाया नेमाडे ,७) राहुल लोखंडे ,८) विजय पाटील, यांनी खोटे ऑफलाईन प्रमाणपत्र काढून शासनाची दिशाभूल केली असून हे प्रकरण बाहेर येताच हे प्रकरण दडपण्यासाठी प्रयत्न सुरू आहे तरी महाशय आपणास विनंती आहे की सर्व ग्रामसेवकांचे प्रमाणपत्र जळगाव जिल्हा वैद्यकीय अधिकारी श्री मारुती पोटे व त्यांचे सदस्य सलीम शेख यांच्यामार्फत पडताळणी करावी या प्रकरणात कोणतीही प्रकारची सेटिंग झाल्यास तसेच ग्रामसेवकांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केल्यास आमच्या दिव्यांग संघटने च्या मार्फ़त रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी.निवेदन देतांना भारतीय जनता पार्टी दिव्यांग आघाडी तालुकाध्यक्ष रजनीकांत शामराव बारी(रावेर), सचिव संदीप रामदास पाटील (केऱ्हाळा) ,श्री दिव्यांग संघटना जिल्हाध्यक्ष संजय दिनकर बुवा(रावेर) उपाध्यक्ष घनश्याम प्रभाकर हरणकर (विवरा) कार्याध्यक्ष विशाल रत्नाकर कासार (सावदा) तालुका अध्यक्ष ईश्वर रामदास महाजन (रावेर) उपाध्यक्ष महेश महाजन, संजय माळी मूकबधिर अध्यक्ष निलेश पाटील(रावेर) संदीप पाटील (कर्जोद) सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!