भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेर

मुख्यालयी न राहणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मारावे लागतात हेलपाटे…

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

खिर्डी ता.रावेर (भीमराव कोचुरे): सर्व सोयी सुविधा उपलब्ध असूनही शासनाच्या विविध स्तरावरील प्रशासकीय विभागातील कर्मचारी हे बाहेर गावाहून २०ते २५ कि.मी अंतरावरून अप डाऊन करत असल्यामुळे आपल्या कार्यालयीन वेळेत कामाच्या ठिकाणी लवकर येत नाहीत.

त्यामुळे गावातील व आजूबाजूच्या गावातील नागरिकांना शासकीय कामानिमित्त संबंधित कर्मचाऱ्यांकडे वारंवार हेलपाटे मारावे लागतात.मात्र साहेब जागेवर थांबत नसल्याने माघारी फिरावे लागते या मध्ये नाहक वेळ व पैसा खर्च होत असून आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो.आज साहेब मीटिंगला गेले,तुम्ही उद्या या किंवा पर्वा या असे सांगितले जाते.सर्व सामान्य नागरिकांची व शासकीय काम वेळेवर पूर्ण करण्याकरिता प्रत्येक कर्मचाऱ्यांनी नेहमी तत्पर राहिले पाहिजे.गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामसेवक,प्रा.शिक्षक,आरोग्य सेवक,आरोग्य सहायक आदी,शासकीय कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी राहत असल्याबाबत संबंधित ग्रामपंचायतीचा ग्राम सभेचा ठराव घेणे बंधन कारक केला आहे.शासकीय कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने याबाबत अनेक वर्ष वाद विवाद सुरू आहे. प्रत्येक वेळी हा विषय कळीचा मुद्दा ठरत असतो.

शासनाच्या विविध प्रशासकीय विभागातर्फे नियुक्त करण्यात आलेल्या वर्ग ३ कर्मचाऱ्यांना त्यांच्या कडून देण्यात येणाऱ्या सेवा विचारात घेवून त्यांना मुख्यालयी राहणे बंधनकारक केले आहे.ग्राम सेवक,आरोग्य सेवक,शिक्षकांना मुख्यालयी राहणे आवश्यक आहे.असे असताना देखील बऱ्याच वेळा सरपंचाचे दाखले सादर करून मुख्यालयी राहत असल्याचे सिध्द करण्याचा प्रयत्न केला जातो.मात्र संबंधित कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याचे शासनाच्या निर्दशनास आले आहे. सन२०१७ते१८या वर्षामध्ये शासनाने निर्देश दिलेले आहे.गाव पातळीवर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने मुख्यालयी राहणे आवश्यक आहे.मुख्यालयी राहत असल्याबाबत कोणाचा दाखला घ्यावा या बाबत सूचना देण्याची शिफारस पंचायत राज समितीने केली असून मुख्यालयी राहत असल्यास सरपंच यांचा दाखला निरुपयोगी ठरणार आहे.शासकीय नियमानुसार ग्रामसभेत संबंधित कर्मचारी मुख्यालयी राहत आहे असा ठराव आवश्यक आहे.परंतु संबंधित कर्मचाऱ्यांनी आपल्या मुख्यालयी राहिल्यास वेळ व कामाचा जास्तीचा असलेला ताण कमी होईल.आणि नागरिकांना पण वारंवार हेलपाटे मारावे लागणार नाहीत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!