भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

चोपडाबोदवळभुसावळमुक्ताईनगरयावलराजकीयरावेर

आगामी रावेर लोकसभेच्या उमेदवारीसाठी खडसेंना पक्षांतर्गत अडसर ?, भाजप धक्का तंत्र वापरणार

मंडे टू मंडे न्युज Politics स्पेशल| आगामी लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election 2024) रणधुमाळी सुरु झाली आहे. सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीसाठी कंबर कसली असून अनेक लोकप्रतिनिधींकडून वेगवेगळ्या मतदारसंघावर दावेदारी केली जात आहे. आता एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या सून रक्षा खडसे (Raksha Khadse) यांनी रावेर लोकसभा मतदारसंघावर (Raver Lok Sabha Constituency) पुन्हा एकदा दावा केला आहे खर मात्र, त्यांना पुन्हा उमेदवारी मिळवणं अनेक अडसर असल्याचे पक्षिय वर्तुळात बोलले जात असून पक्षांतील काहीं वरीष्ठ नेत्यांसह पदाधिकाऱ्यांचाचं त्यांच्या उमेदवारीला विरोध असल्याची खात्री लायक माहिती आहे. इच्छुक उमेदवार दिल्ली दरबारी फिल्डिंग लावण्यात व्यस्त दिसून येत आहेत. अश्यात भाजपच्या धक्का तंत्राचा प्रयोग रावेर लोकसभेसाठी करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी निरीक्षक नेमून प्रत्येक मतदारसंघातील खासदारांचं रिपोर्टकार्ड तयार केलं आहे. खासदारांचं कामकाज आणि सर्वसामान्य नागरिकांचं त्याबद्दल काय म्हणणं आहे, तसेच विद्यमान खासदाराऐवजी आणखी कुणाला या मतदारसंघातून उमेदवारी दिली जाऊ शकते, अशी दोन, तीन नावांसह अहवाल आता बंद लिफाफ्यात दिल्लीला वरिष्ठ नेत्यांकडे पाठवण्यात आला आहेत. यावर दिल्लीश्र्वर काय निर्णय घेतात यावर रावेर मधुन पुन्हा खडसेंना संधी दिली जाते की दुसरा चेहरा मैदानात उतरवला जातो हे ठरणार आहे.

महाराष्ट्रात भाजपाचे निरीक्षक मतदारसंघनिहाय आढावा घेत त्यांनी पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली आहेत. निरिक्षकानी पदाधिकाऱ्यांशी वन टू वन एक-दोन मिनिटांमध्ये उमेदवाराबाबत माहिती घेणे निरीक्षकांना पचणी पडले का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. इच्छुक आपल्याला उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील राजकारणाचा पोत बराच बदलला आहे. पूर्वाश्रमीचे भाजपचे नेते एकनाथ खडसे आता राष्ट्रवादीत शरद पवार गटातून उमेदवारी करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.इतकेच नव्हे तर राष्ट्रवादीच्या संभाव्य यादीत त्यांचे नावही आले आहे. भाजपचे जुने मित्रपक्ष  ठाकरे यांची शिवसेना विरोधी पक्षासोबत आहे. तसेच शिंदे गटांचे समर्थक आ. पाटीलही खा. खडसेंना उमेदवारी दिल्यास कितपत सहकार्य करतात हा प्रश्नच आहे. त्यामुळे पक्ष विद्यमान  उमेदवारांना पुन्हा संधी देवून भाकरी तीच ठेवणार कि नवीन उमेदवारांना संधी देऊन फिरवणार याकडेच आता जिल्ह्यासह राज्याचे लक्ष आहे.

खासदार रक्षा खडसे यांचे तिकीट धोक्यात आहे अशी चर्चा पक्षीय वर्तुळात आहे. याचे कारण म्हटले तर भाजपचे धक्कातंत्र मोदी आणि शहा यांच्या रणनितिक धोरण पाहता छत्तीसगड, राजस्थान व मध्यप्रदेश या राज्यांत भाजपचे अनेक बड्या नेत्यांना धक्के दिल्याचे पाहायला मिळाले आहे असाच धक्का तंत्र भाजप लोकसभेतही वापरणार असल्याची शक्यता असून अशा वेळी रावेर लोकसभेसाठी मोदी शहा ही नीती वापरू शकता आणि अश्या धक्क्यात खा. खडसेंचा पत्ता कट केला जाऊ शकतो. आणि नविन चेहरा मैदानात उतरवला जाऊ शकतो. असे असले तरी शेवटच्या क्षणी राजकीय उलथापालत झाल्यास चित्र बदलु शकते. आणी खडसेही बाजी मारु शकतात.

उमेदवारांपेक्षा महाजन-खडसे यांच्यातच मुख्य लढत–

रावेर लोकसभा मदारसंघांत उमेदवारांपेक्षा माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे आणि ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्या मुख्य लढत होणारं आहे. खडसे महाजन यांची राजकीय वैर सर्वश्रुत आहे अश्यात महाजन आणि खडसे आप आपल्या पक्षाच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठीं पूर्ण ताकद लावणार हे निश्चित आहे. भाजपचे पूर्वाश्रमीचे नेते तथा राष्ट्रवादीचे आ एकनाथराव खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. खासदार खडसेंनी नाथाभाऊ यांनी भाजपमध्ये यावें अशी माझी व कार्यकत्यांची ईच्छा असल्याचे म्हंटले होते मात्र, नंतर त्यांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेल्याचे सांगत घुमजाव केला होता. यावर राष्ट्रवादीचे नेते आमदार खडसेंनी आपणं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातच राहणार असल्याचे सांगत भाजपच्या प्रवेशावर पूर्ण विराम दिला आहे. यावर मंत्री गिरीष महाजन यांना पत्रकारांनी विचारले असता कुटुंबातील व्यक्तींच भाजपमध्ये येण्याची इच्छा दर्शवत भाजपमध्ये येण्याचे आवाहन करत असल्याची मिश्किल टोला खासदार रक्षा खडसे यांना लगावला होता.

आ. एकनाथ खडसे राष्ट्रवादीत असताना अश्यात भाजप खासदार खडसेंना भाजपकडून उमेदवारी दिल्यास जनतेत वेगळा संदेश जाऊ शकतो व त्यांची किंमत भाजपला कमी जास्त प्रमाणात मोजावी लागू शकते असे राजकीय जाणकार सांगतात अश्यात भाजपच्या एका गटाला खडसे नाव नको असल्याचीही चर्चा पक्षाच्या गोटात आहे. आणि या संदर्भात खुद्द खासदार रक्षा खडसे यांनी बोलुन दाखवले होते.  आ एकनाथराव खडसे यांच्या मतदासंघांतील प्रभाव पाहता त्यांना टक्कर देणारा त्या तोडीचा उमेदवार भाजपला द्यावा लागणार आहे. या सर्व परिस्थितीत नाथाभाऊ यांना कोंडीत टाकण्यासाठी भाजप पुन्हा खा. खडसेंना संधी देऊ शकतो अशीही शक्यता आहे. या सर्व घडामोडीत फडणवीस आणि मंत्री गिरीष महाजन यांची भुमिका निर्णायक राहणार असली तरी मोदी शहांचा निर्णय अंतिम असल्याने कुठल्या धक्का तंत्राचा वापर करतात  हे वेळच सांगेल.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!