अपंगत्वाचे खोटे प्रमाणापत्रानी शासनाची फसवणूक : ५ ग्रामसेवकांचे प्रमाणपत्र अवैध !
रावेर, प्रतिनिधी : तालुक्यातील काही ग्रामसेवकांनी अपंगत्वाचे खोटे प्रमाणापत्र मिळवून त्याचा लाभ घेतलेल्या ५ ग्रामसेवकांचे ते प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्याने खोटी प्रमाणपत्र मिळवून लाभ घेणाऱ्या कर्मचाऱ्यांनमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक असे, तालुक्यातील ग्रामसेवकांनी अपंगत्वाचे खोटे दाखले मिळवून नोकरीत बदली करण्यासाठी व सोयी लाटण्यासाठी त्यांचा वापर केलेले दाखले धुळे शासकीय वैदकीय महाविद्यालयाच्या त्रिस्तरीय समितीने रद्द केले आहे,रद्द करण्यात आलेल्या प्रमाणपत्रात नितीन दत्तू महाजन,राहुल रमेश लोखंडे,रवींद्रकुमार काशिनाथ चौधरी,छाया रमेश नेमाडे,शामकुमार नाना पाटील या ग्रामसेवकांचा समावेश आहे.
याप्रकरणातील संबंधित ग्रामसेवकांनी सोयीच्या ठिकाणी बदली करण्यासाठी व इतर लाभ घेण्यासाठी या सर्टिफिकेटचा वापर करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी संबंधितांवर कारवाई बाबत पंचायत समितीकडून जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी यांना पाठवण्यात येणार आहे.