खिर्डी खु येथे मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा– वाहन धारकांची मागणी
खिर्डी खु ता,रावेर (भिमराव कोचुरे)। गावातील मुख्य रस्त्यावर फिरणाऱ्या मोकाट जनावरांच्या कळपा मुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. यामुळे अपघाताची शक्यता वाढली असून वाहन चालकांना आपला जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. रस्त्यावर मोकाट जनावराची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
मागील अनेक दिवसांपासून पाळीव मोकाट जनावरांच्या त्रास वाढत असताना त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत असता गावातील मुख्य बाजार पेठ ते बलवाडी रस्ता हा नेहमी रहदारीचा असल्याने वाहनांची वर्दळ सुरू च असते. मात्र रस्त्यावर मोकाट जनावरे फिरत असल्यामुळे येथे अनेकदा वाहन चालकांना अचानक ब्रेक मारावा लागतो. त्यातून अपघात होण्याचा धोकाही वाढला आहे. या भागात जनावरे रस्त्याच्या मध्यभागी कळ पा कळपाने बसल्यामुळे वाहन धारकांना साईड देण्यासाठी जागा नसल्याने वाहतूक खोळंबते.या मुळे वाहन धारकांना नाहक मनःस्ताप सहन करावा लागतो. ग्राम पंचायत प्रशासना ने वारंवार लेखी व तोंडी सूचना देवून सुध्दा गावातील पशू पालक आपली जनावरे मोकाट सोडत असल्या मुळे वाहन धारकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मोकाट जनावरांचा बंदोबस्त लवकरात लवकर करावा अशी मागणी वाहन धारकांनी व सुज्ञ नागरिकांनी केलेली आहे.