भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमरावेर

पोलिसांपेक्षा जुगारी एक पाऊल पुढे; “मंडे टू मंडे न्युज” ची बातमी अनं पोलिस पोहोचण्या आधीच जुगारी फरार, पोलिसांपेक्षा जुगाऱ्यांचे नेटवर्क मजबुत ! तो खबरी कोण ?

रावेर, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क | अवैध धंद्यांवर पोलीस प्रशासन शिताफीने माहिती जुळवत कारवाई केल्याचे आपण बघितले असेलचं मात्र रावेर तालुक्यात स्थानिक पोलिस प्रशासनावर पत्ता जुगारअड्ड्यावाल्याचे नेटवर्क भारी पडत आहे. कारवाई करण्याआधीच पत्ता क्लब वाल्यांना पोलीस गोटातून कारवाईसाठी येतं असल्याची माहिती पोहच केली जात असल्याने परीसरात चर्चिले जात असून यामुळें पोलिसांपेक्षा जुगारी एक पाऊल पुढे असल्याची चर्चा सदरील प्रकरणाने संपूर्ण तालुक्यात रंगली आहे. पोलीस गोटातील तो जुगाअड्ड्यावाल्याचा खबऱ्या कोण ? याबाबत नागरिकांमध्ये अनेक अंदाज बांधले जात असून तर्क लावले जात आहेत.

रावेर तालुक्यातील चोरवड-खानापूर परिसरात पत्ता-जुगाराचा मोठा अड्डा खानापूर – नवीन अजनाड रस्त्यावर स्मशानभूमी जवळील शेतात लग्न समारंभात टाकतात त्या प्रमाणे टेंट टाकून सुरू होता, या बाबत “मंडे टू मंडे न्युज ” ने व्हिडीओ सह बातमी प्रसिद्ध केली, वरिष्ठ पातळीवरून आलेल्या आदेशाने स्थनिक पोलीसांनां पथक घेऊन कारवाईसाठी घटनास्थळी जावे लागले मात्र तो पर्यंत जुगार खेळणारे १२५ ते १५० जुगारी तेथून पसार झाले, यांमुळे पोलिसांपेक्षा जुगारी एक पाऊल पुढे असून पोलिसांपेक्षा जुगाऱ्यांचे नेटवर्क मजबुत असल्याचे परीसरात चर्चिले जात आहे. कारवाईसाठी पोलीस येतं असल्याची माहिती पोलिसांशीवाय कुणालाच नव्हती मग… जुगाऱ्याना माहिती मिळाली कशी? की कुण्या झारीतील शुक्राचार्य यांनी ती माहिती पोहचं केली ? असे परिसरासह तालुक्यात बोलले जात आहे. सदरचा रस्ता खराब असल्याने पथकाला पोहचण्यास उशीर झाल्याचे पथकाकडून सांगितले गेले. परंतु खरंच रस्ता इतका खराब आहे का? की मुद्दामहू पोलीस उशिरा पोहोचले…?

दरम्यान, जनतेतून असा प्रश्न उपस्थित केला जात आहे की, वरुन आदेश असल्याने पोलीस कारवाई साठी येत आहेत, या बाबत डिपार्टमेंट शिवाय कोणालाही माहिती नसताना जुगार चालक व जुगार खेळणारे तेथून पळून कसे गेले, या मुळे पोलीस गोटातून माहिती काढण्यात जुगार व्यावसायिकांचे नेटवर्क मजबुत असल्याची चर्चा परीसरात होत आहे. की पोलीस प्रशासनात झारीतील शुक्राचार्य आपली भुमिका चोख बजावत आहे? हे जुगाऱ्यांना खबरी देणारे कोण? याची चौकशी होणे महत्वाचे आहे. यामागे हप्ते खोरीचे मायाजाल असल्याचीही चर्चा ऐकायला मिळत आहे. परिसरातील या अवैध धंद्यांबद्दल पोलीसांना माहिती नव्हती का ? असा प्रश्न यानिमत्ताने विचारला जात असून या मुळे पोलिसांच्याच भूमिकेवर प्रशचिन्ह उपस्थित केलं जात आहे.

जुगार अड्डा आताच्या घडीला तूर्त जरी बंद असला तर तो किती दिवस बंद राहील? की जागा बदलून पुन्हा सुरू होईल ? या आधी हा जुगार अड्डा चोरवड येथे सुरू होता, या बाबत अनेक तक्रारी झाल्याने ती जागा बदलवून ‘तो’ जुगार अड्डा या ठिकाणी सुरू करण्यात आला होता, त्याच प्रमाणे आत पुन्हा जागा बदलवण्यात येऊन दुसऱ्या ठिकाणी पुन्हा सुरू करण्यात येईल का? यासंदर्भात परिसरातील नागरिकांनी अनेक तक्राराही केल्या पण आर्थिक हितसंबंधांमुळे प्रशासनाने कारवाई करण्यास दुर्लक्ष केले असे आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!