गझलवैदर्भी चे पहिले राज्यस्तरीय मराठी गझल संमेलन २७ नोव्हेंबर ला रावेर येथे
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
रावेर,मंडे टू मंडे प्रतिनिधी। गझलवैदर्भी चे पहिले राज्यस्तरीय मराठी गझल संमेलन रावेर जिल्हा जळगाव येथे दिनांक २७ नोव्हेंबर २०२१ रोज शनिवार ला अग्रसेन भवन रावेर येथे आयोजित केले आहे . या गझल साहित्य संमेलनाचे अध्यक्ष अंकुर साहित्य संघाचे केंद्रीय अध्यक्ष प्रसिद्ध साहित्यिक हिंमत ढाळे हे आहेत तर उदघाटक म्हणून प्रसिद्ध साहित्यिक सेवानिवृत्त अभियंता डॉ. प्रमोद काकडे हे आहेत संमेलनाचे स्वागताध्यक्ष गझलेचा बादशहा श्री चंद्रशेखरभुयार राहणार आहेत.
यामध्ये गझलेवरील व्याख्यान प्रसिद्घ गझलकार शिवाजी जवरे हे सादर करतील गझल मुशायरे दोन होणार असून या पहिल्या गझल मुशायरा चे अध्यक्ष बबन धुमाळ पूणे असतील पहिला गझल मुशायरा दुपारी 2 वाजता सुरू होईल तर दुसऱ्या मराठी गझल मुशायऱ्याचे चे अध्यक्ष हिंदी साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त डॉ. गणेश गायकवाड हे आहेत , दुसरा मुशायरा रात्री ठीक 7 वाजता सुरू होईल , तसेच सम्मेलनातमध्ये अभिरुप न्यायलय असून आरोपी जनार्दन मात्रे वकील प्रा रुपेश देशमुख व प्रा रवी चापके हे आहेत तर न्यायधिशाची प्रमुख भुमिका कवी किरण डोंगरदिवे पार पाडणार आहेत , अभिरुप न्यायालय कार्यक्रम दुपारी 1 ते 2 या वेळेत होईल , मराठी गझल मुशायरा चे संचलन प्रा रवी चापके प्रफुल्ल भुजाडे आणि विद्यानंद हाडके हे करणार आहेत.
या संमेलनात विशेष उपस्थिती एकनाथराव खडसे (माजी महसूल मंत्री) आमदार शिरीशदादा चौधरी , आमदार चंद्रकांत पाटील, रंजनाताई पाटील (अध्यक्ष जि प जळगाव) रोहिणीताई खडसे (चेअरमन जिल्हा बँक जळगाव) कविताताई कोळी (सभापती पं स रावेर) दारामोहम्मद (नगराध्यक्ष रावेर) मुकेश दलाल , श्रीराम पाटील , भागवत पाटील , डॉ संदिप पाटील , संजय अग्रवाल हे उपस्थित राहणार आहेत या संमेलनास महाराष्ट्र्रातील नामवंत गझलकार उपस्थित राहणार आहेत तरी आपण या संमेलनास उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांनी केलेले आहे*