रावेर पुरवठा विभागातील कथित भ्रष्ट्राचार प्रकरणी आठ दिवसात लेखी खुलासा द्या- प्रांतधिकारी
Monday To Monday NewsNetwork।
रावेर(प्रतिनिधी)। रावेर पुरवठा विभागात शासकीय अर्जात परस्पर बदल करणे, अनुमती नसताना अर्ज छापून विक्री ,राजमुद्रा असलेला तहसीलदारांच्या शिक्क्याचा गैरवापर तसेच प्रति कार्ड ३ रुपयेप्रमाणे छापलेल्या अर्जांची विक्री यासह इतर कारणांवरुन येथील तत्कालीन पुरवठा अधिकारी यांचेवर आरोप आहे .रावेर पुरवठा विभागाची दोनमहिन्यांपासुन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या आदेशावरुन फैजपुरचे प्रांतधिकारी कैलास कडलक चौकशी करत आहे.
गेल्या दोन महिन्यां पासून आतापर्यंत तालुक्यातील रेशन दुकानदारांचे लेखी खुलासे घेण्यात आले आहेत.चौकशी सुरू असता ,रावेर पुरवठा विभागातील कथित भ्रष्ट्राचार प्रकरणात प्रांतधिकारी कैलास कडलक यांनी रावेरच्या तहसीलदार उषाराणी देवगुणे यांना पुढच्या आठ दिवसात लेखी खुलासा मागितला आहे.याबाबतचे पत्र रावेर तहसील कार्यालयाला प्राप्त झाले आहे.या खुलशात काय निष्पन्न होते ,कारवाई होते की….काय ? या कडे तालुका वासीयचे लक्ष लागून आहे.