भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेर

अर्थकारणातून महसूल विभागाशी हातमिळवणी ; परवाना मध्यप्रदेशचा,वाळू वाहतूक रावेर विभागातुन

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

रावेर,मंडे टू मंडे वृत्तसेवा। मध्यप्रदेश शासनाचा वाळू वाहतूकीचा परवाना दाखवून रावेर परिसरातून मोठ्या प्रमाणावर वाळूची वाहतूक सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार सुरू आहे.

वाळू वाहतूक दारांची नवी शक्कल
रावेर तालुक्यात वाळूची वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी महसूल विभागातर्फे करण्यात येत असते. परन्तु हा जनतेला देखावा दाखविला जातो , मध्यप्रदेश शासनाकडून घेतलेला वाहतूकीचा परवाना दाखवून महाराष्ट्रात म्हणजेच रावेर मध्ये वाळूची वाहतूक करणारे वाहन सोडण्यात येत आहे.  वाळू वाहतूक दारांनी आता ही नविन शक्कल वापरली आहे. 

या बाबत अधिक माहिती घेतली असता, महसूल पथकाने अवैध वाळुचे ट्रक्टर पकडल्यास स्पॉटवर पंचनामा केला जातो. त्यामध्ये ट्रक्टर,ट्रक्टर नंबर, पकडलेल्या टीमचे नाव, वेळ व तारीख असते व ट्रक्टर तहसिलमध्ये जप्त देखील केले जाते. परंतु नंतर अवैध वाळू  वाहतूकदार लागलीच मध्य प्रदेश मध्ये जाऊन तेथून वाळू वाहतुकीचा परवाना आणतो नंतर जप्त केलेल्या वाळूच्या ट्रक्टरचा पंचनाम्यात बदल केला जातो.व नियमानुसार वाहतूक करीत असल्याचे भासवून दंड न घेताच ट्रेक्टर सोडुन दिले जात असल्याचा प्रकार घडत आहे. यात मोठे अर्थकारण सुध्दा केले जात असल्याचे वृत्त आहे.
मध्यप्रदेशातील पावत्या दाखविल्यामुळे महाराष्ट्र शासनाचा मोठा महसूल बुडत आहे.
रावेर तालुक्याच्या हद्दीत असलेले तापी नदी, भोकर परिसर, खिरवड,नेहता,दोधा,पातोडी, निभोरासीम,आटवाडा, पुनखेडा, बार्डी परिसरातून वाळूची मोठ्याप्रमाणावर अवैध वाहतूक होत आहे. ( भाग-१ )

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!