विवाहितेचा दिड लाखांसाठी छळ : पतीसह तिघांवर गुन्हा !
रावेर, मंडे टू मंडे वृत्तसेवा : तालुक्यातील एक विवाहितेला माहेरहून फोर व्हीलर घेण्यासाठी १ लाख ५० हजार रुपये आणण्यासाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्या प्रकरणी पतीसह सासरच्या तीन जणांविरूद्ध रावेर पोलिस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत अधिक असे, तालुक्यातील २५ वर्षीय विवाहित महिलेचे पाडळा येथील माहेर आहे. तिला सासरच्या मंडळींकडून तुझ्या आई-वडीलांकडून चार चाकी वाहन घेण्यासाठी दिड लाख रुपये घेऊन ये म्हणत शारीरिक व मानसिक छळ करण्यात येत होता. तसेच विवाहितेला पतीकडून वेळोवेळी तुला फारकत देऊन टाकेल अशी धमकी देण्यात येते असल्याने व माहेरून पैशे आणण्याची मागणी सासरच्या मंडळींकडून होत असल्याने याप्रकरणी पिडीत महिलेच्या फिर्यादीवरून पती मुकर तडवी, सासरे नासिर तडवी, सासू ऐनुर तडवी (रा. पंचक ता.चोपडा) या तिघांनविरुद्ध रावेर पोलिस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.