मृताच्या कुटुंबास घरकुलसह आर्थिक सहाय्य देण्याचे गृहमंत्री देशमुखांचे निर्देश
रावेर (प्रतिनिधी)। गृह मंत्री अनिल देशमुख यांनी आज बोरखेडा येथे हत्या झालेल्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांनी मृतांच्या कुटुंबांला घरकुल ,जमीन आणि आर्थिक मदत देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना दिले.
महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज दुपारी बोरखेडा येथील पीडित कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करून पीडित कुटुंबाला सर्वतोपरी मदत देण्याचे आश्वासन दिले , गृहमंत्र्यांनी जिल्हाधिकार्यांना निर्देश देत संबंधित पीडित कुटुंबाला घरकुल, आर्थिक मदत आणि जमीन देण्याचे निर्देश दिले या वेळी रावेरचे आमदार शिरीषदादा चौधरी , अमळनेरचे आमदार अनिल भाईदास पाटील, राष्ट्रवादीचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील तसेच राष्ट्रवादीचे पदाधिकारी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते