रावेर हनीट्रॅप प्रकरणातील ब्लॅकमेलर महिलेसह मुलाला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
रावेर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क |रावेर शहरातील एका प्रतिष्ठित धनाढ्य व्यक्तीला ब्लॅकमेल करून पैसे उकळण्याचा प्रकार घडल्याने या बाबत संबंधित व्यक्तीने रावेर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केल्याने रावेर मधील हनी ट्रॅप प्रकरण उजेडात आले. याप्रकरणात एका महिलेला व तिच्या मुलाला अटक करण्यात आली असून गेल्या चार दिवसांपासून आरोपी महिला व तिचा मुलगा पोलिस कोठडीत आहे. अटकेत असलेल्या महिलेला आणि तिच्या मुलाला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
रावेर येथील हनी ट्रॅप प्रकरणात एका प्रतिष्ठित धनाढ्य व्यक्तीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्याचेशी शारीरिक संबंध प्रस्थापित करून त्याचा व्हिडिओ चित्रित करून त्या आधारे ब्लॅक मेल करून प्रतिष्ठित व्यक्ती कडून
चोपडा तालुक्यातील लोणी अडावद येथील “प्रतिभा” नामक महिलेने लाखो रुपये उकळल्याची घटना समोर आल्याने या घटनेने परिसरासह जिल्ह्यात खळबळ उडाली. गेल्या चार पाच दिवसांपासून पोलिस कोठडी असलेल्या आरोपी महिलेसह मुलाला आज कोर्टात हजर केले असता त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
पोलिस तपासात आणखी काय काय निष्पन्न झालं. महिलेच्या जाळ्यात अडकलेल्या आणखी कोणा कोणाची नावे समोर आली या बाबत अद्याप कुठलीही माहिती बाहेर आलेली नाही. मात्र बरेच प्रकरणे बाहेर येण्याची शक्यता आहे. त्या मुळे महिलेच्या या महाजालात अडकलेल्या प्रतिष्ठित धनाढ्य लोकांमध्ये मात्र भीतीचे वातावरण निर्माण झालेलं आहे. पोलीसांकडून चौकशी सुरू असून या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक अंकुश जाधव करीत आहेत.