भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरशैक्षणिक

आदर्श शिक्षक पुरस्कार प्रस्ताव : रावेर गट शिक्षणाधिकाऱ्याची माफी, पुरस्कार आर्थिक देवाण-घेवणीतून ?

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

रावेर, मंडे टू मंडे वृत्तसेवा। रावेर ता.जि.जळगांव येथील पंचायत समिती सभागृहात दि.९ सप्टेंबर २०२१ गुरुवार रोजी घेण्यात आलेली आढावा बैठकीत शिक्षक पुरस्कार प्रस्ताव पंचायत समिती रावेरच्या सभागृहाला अंधारात ठेवून जिल्हा परिषद जळगांव येथे परस्पर पाठवण्यात आल्याच्या कारणावरून आढावा बैठकीत उपस्थित जागृत सदस्यांनी प्रश्न उपस्थित केल्याने येथील गट शिक्षणाधिकारी शैलेश दखणे यांनी सभागृहात चक्क माफी मागितल्याने एकच खळबळ उडाली व त्याच्या भूमिकेबद्दल संशय व्यक्त करण्यात येत आहे.

यावेळी सभापती यांनी सदरील पुरस्कार कोणाच्या सांगण्यावरून देण्यात आला अशी थेट विचारणा गट शिक्षणाधिकारी दखणे यांना केली. दखणे यांनी आपल्या म्हणजे सभापतीच्या शिफारशीवरून दिल्याचा मुद्दा मांडला यामुळे सभापतीच्या भूमिकेबाबत बैठकीत संभ्रम निर्माण झाला मात्र सभापती यांनी असे पत्र न दिल्याचे यावेळी सांगितले.मात्र यामुळे सभागृहात आढावा बैठकीत जागृत सदस्यांकडून जाहीर झालेल्या आदर्श शिक्षक पुरस्कार संबंधी आर्थिक देवाण-घेवाण, झाल्याची शक्यता सह परस्पर प्रस्ताव जि.प. मध्ये पाठवणारे कोण? तीन आपत्य असतांना पुरस्कार देता येतो का? नेमके किती प्रस्ताव आले होते? रावेरमधून कोणाचा प्रस्ताव आला नव्हता का? इतर शिक्षकांना माहिती देण्यात आली होती का? असे पुरस्काराशी निगडित विविध प्रश्न उपस्थित करण्यात आले . यावरून गट विकास अधिकारी दिपाली कोतवाल यांनी विचारणा करून गट शिक्षणाधिकारी शैलेश दखणे यांना अशी गंभीर चूक व्हायला नको फक्त आढावा बैठकीत एवढेच सांगून मोकळे झालेले दिसत आहे.या मुळे गट विकास अधिकारी दीपाली कोतवाल यांचीही भूमिका संशयास्पद नाही का?

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!