तळोदा-बऱ्हाणपूर महामार्ग नियोजित सावदा मार्गे रावेर शहरातून न गेल्यास लोकप्रतिनिधींना परवडणारे नाही ?
मंडे टू मंडे न्युज नेटवर्क चंमु | तळोदा- बऱ्हाणपूर नियोजित महामार्ग सावदा शहर मार्गे रावेर शहरामधून न घेता मुक्ताईनगर मार्गे वळवल्याने रावेर तालुक्याला पूर्व भागास विकासापासून वंचित ठेवण्याचा घाट ? यांमुळे नागरिकांची नाराजी खासदार, आमदार व लोकप्रतिनिधी यांना परवडणार नसल्याचे एकूण चित्र दिसायला लागले आहे.
सावदा व रावेर शहरातून गेलेल्या अंकलेश्र्वर बऱ्हाणपूर महामार्गाच्या चौपदरीकरणावरुन वाद सुरू असून महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात येत आहे. यासाठी तळोदा बऱ्हाणपूर नियोजित महामार्ग सावदा मार्गे रावेर शहरामधून जाण्याचे नियोजित होते मात्र, तो रावेर तालुक्यातील सावदा व रावेर शहरातून न घेता अंतूर्ली मार्गे मुक्ताईनगर तालुक्यातुन वळवल्याने रावेर तालुक्यातील नागरिकांची नाराजी स्थानिक खासदार व आमदार लोकप्रतिनिधी यांच्या विषयी वाढत असून नागरिकांचा हा लोकप्रतिनीधींवरील वाढता रोष आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर परवडणारा नसल्याचे बोलले जात आहे.
सावदा व रावेर शहर हे मुख्य बाजारपेठ असून बागायती शेती मोठ्यप्रमाणावर होत असल्याने केळीचे मोठे मार्केट या भागात आहे. केळी प्रश्न असो वा अन्य, तालुक्याला विकासापासून वंचित ठेवण्यात येत असल्याची ओरड नेहमीच तालुक्यांतील नागरिकांची आहे असे असताना चौपदरीकरणाचा हा मार्ग रावेर तालुक्यातील सावदा व रावेर शहर वगळल्याने लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यान विषयी मोठा रोष नागरिकांकडून व्यक्त करण्यात आला व येतंही आहे.
रावेर तालुक्यातील नागरिकांकडून महामार्ग वळवण्याच्या माहिती नंतर तालुका वासियांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटायला लागल्याचे पाहून लोकप्रतिनिधीनी कुणी निवेदन तर कुणी सत्ताधाऱ्यांवर आरोप केलें. रावेरच्या खासदार रक्षा खडसे यांनी महामार्ग नियोजीत मार्गानेच रावेर तालुक्यातूनच नेण्यात यावा यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन दिले खरे मात्र, त्या संदर्भात त्या दिशेने वेगवान पावलं उचलताना प्रशासकीय पातळीवर होताना दिसत नाही. त्यामूळे खासदार रक्षा खडसे वर नाराजी वाढत आहे. तर दुसरीकडे रावेर यावल मतदासंघांचे आमदार शिरीष चौधरी यांची या संदर्भात सत्ताधाऱ्यांवर प्रकरण लोटून देत सरकार दरबारी पाठ पुरावा करण्यास होत असलेली दिरंगाई यांमुळे आ शिरिष चौधरी विषयीही नाराजीचा सुर वाढत असल्याचे तालुक्यातील नागरिकांमध्ये जागृत नागरीक बोलून दाखवत आहेत. तर तालुक्यातील सत्ताधारी महायुती भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून मोन बाळगत असल्याचे दिसत आहे.