ऐंनपुरमध्ये अवैध देशी दारूची जत्रा, आळवी बाटली झाली उभी : पोलीस प्रशासन कोमात
ऐंनपुर ता.रावेर, प्रतिनिधी : येथील गजबजलेल्या भागामध्ये अवैध धंद्यांना तेजी आल्याचे चित्र असून निंभोरा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील ऐनपूर सह परिसरात अवैध देशी दारूची तस्करी करून सर्रास विक्री सुरू आहे. या दारु विक्रीकडे मात्र राज्य उत्पादन शुल्क व पोलीस विभागाचे हेतूपुरस्पर दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे.
ऐनपूर येथील गजबजलेल्या बसस्थानक परिसरात अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने काही दिवसांपूर्वी ऐनपूर येथे महिला मंडळाने दारूबंदी बाबत आंदोलन केले होते व त्यावर मतदान घेवून बाटली आडवी झाली होती व देशी दारू दुकान बंद करण्यात आले होते. परंतू पुन्हा काही महिन्यांनतर ज्या ठिकाणी देशी दारुचे दुकान बंद झाले होते त्याच ठिकाणी त्याच दुकानात दारूची विक्री होत आहे. तसेच खिर्डी रोडने टपऱ्या व हात गाड्यांवर देशीदारू ची विक्री जोमात सुरू असून गजबजलेल्या भागात सुरू असलेले ही अवैध धंद्यांची जत्रा पोलिसांच्या नजरेस न पडणे हे एक आश्चर्यच आहे की….?
गावांमध्ये खुलेआम पणे अवैध धंद्याचा बोलबाला असताना या कडे जाणूज -बुजून दुर्लक्ष केले जाते, यावर पोलीस प्रशासन कुठलीही कारवाई करीत नाही, त्यांना आर्थिक रसद पोहचवली जात असल्याने अवैध धंद्यांवाल्यांची पोलीस प्रशासन पाठराखण करण्याचे काम पोलीस प्रशासन करीत असल्याचे परिसरात बोलले जाते तसेच ऐनपूर बस स्टॅण्ड परिसरात दारू विक्री खुलेआम सुरु आहे. यावर स्थानिक प्रशासन योग्यती कारवाई करणार का? दारुमुळे बऱ्याच लोकांचे संसार उद्धवस्त झाले आहे. बरीच तरुण लोक दारुच्या आहारी गेले आहे. व त्यांचे जीवन उद्धवस्त झाले आहे. यांच्यावर स्थानिक प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी व अवैध देशी दारू विक्री बंद करण्यात यावी अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.