कुर्बानीसाठी गुरांची अवैध वाहतूक करणारे वाहनासह आरोपी अटकेत; रावेर, यावल तालुका गोवंश तस्करांचे मोठे केंद्र !
रावेर (विशेष प्रतिनिधी)। गोवंश जातीचे मुर्हा जातीचे काळ्या रंगाच्या २ म्हशी व ३ मुर्हा व १ गावरान म्हैस जातीचे पाडे(हेले) हे महिंद्रा पिकप वाहनामध्ये व मुर्हा जातीचे १३ म्हशी व ७ पाडे (हेले) आयशर गाडीत दाटीवाटीने गुरांचा जीवास इजा होईल असे कोंबुन तसेच गोवंश हत्या करण्यासाठी विनापरवाना अवैध वाहतूक करीत असलेले महिंद्रा पिकप वाहन व आयशर गाडीतून वाहतूक करणाऱ्यांना आज दिनांक २९ जुलै २०२० रोजी सकाळच्या सुमारास महाराष्ट्र व मध्यप्रदेशच्या सीमेवर अटक करण्यात आली आहे. यावल, रावेर, चोपडा तालुका हे गोवंश तस्कराचे मोठे केंद्र असल्याचे तसेच यावल, रावेर, चोपडा तालुक्यातून नेहमी चोरीच्या ज्या घटना घडल्या आहेत आणि घडत आहेत त्या घटनांची चौकशी केल्यास गुरं-ढोरं चोरीचे फार मोठे रॅकेट उघडकीस येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की आज दिनांक २९ जुलै २०२० बुधवार रोजी सकाळीच्या सुमारास आंतरराज्जीय सीमेवरील तपासणी नाकाबंदी दरम्यान वाहने चेक करीत असताना ओमप्रकाश नवलसिंग गोलकर वय रा. आरुद ता पंधाना जि खंडवा; २) शेख फिरोज शेख मजीद रा खंडवा विमलीपुरा; ३) सादिक शाह हकीम शाह रा झोकर ता मकसिद जि शाजापुर म प्र; ४) रईस सईद कुरेशी रा आष्टा जि सिहोर म प्र; ५) नासीर समी कुरेशी रा आष्टा जि सिहोर म प्र; ६) साहिद रईस मनसुरी रा आष्टा जि सिहोर म प्र & सोहेल मिन्नत कुरेशी रा झोकर ता मकसिद जि शाजापुर म प्र या आरोपींनी एक पांढर्या रंगाची महिंद्रा कंपनीची पीक अप एमपी१२ जीए- १९१० यात गुरे कोंबून भरल्याचे आढळून आहे. यामध्ये मुर्हा जातीचे काळ्या रंगाच्या २ म्हशी व १ गावरान म्हैस व ३ मुर्हा जातीचे पाडे(हेले) असे दिसून आले. यानंतर लागलीच याच गाडीच्या मागून आलेल्या आयशर वाहन एमपी ९ जीएच- १५३७ या वाहनात मुर्हा जातीचे काळ्या रंगाच्या १३ म्हशी व ७ पाडे (हेले) ही गुरे आढळून आली. त्यांची कत्तल करण्यात येणार असल्याची माहिती सुध्दा तपासात समोर आली. बेकायदा कोणत्याही प्रकारची खरेदी विक्री पावती नसतांना वाहतूक तस्करी केली म्हणून वरील सर्व आरोपींवर रावेर पोलीस स्थानकात भाग ६ गु र न-५९/२०२० कलम-महा. पशुक्रृरता अधि.11(1)(A)(F)(H)(K)(I) सहकलम-मु पो का-119 सहकलम-महा.मोटर वाहन अधि.83/177,सहकलम-पशु वाहतुक अधि.-47,48,49(अ),50 अन्वये बेकायदेशीर, विनापरवाना गोवंश ततस्करी प्रकरणी महेंद्रा पीकअप व्हॅन व आयशर गाडीलाही जप्त करण्यात आले असून आरोपींच्या विरूध्द गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. डीवायएसपी नरेंद्र पिंगळे व पोलीस निरिक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास निलेश चौधरी हे करीत आहेत.
रावेर, यावल तालुक्यात ठिक– ठिकाणी अनेक गुरंढोरं कत्तल खान्यानाना अधिकृत परवानगी नसताना अवैध अनधिकृत कत्तलखाने सुरू असून मोठ्या प्रमाणात मांस वाहतूक करण्यात येत असते याकडे नगरपालिका प्रशासन, ग्रामपंचायत विभाग, पोलिसांचा तिसरा डोळा म्हणून ओळख असणारे पोलीस पाटील आणि वाहतूक पोलिस यांनी संयुक्त मोहीम राबविल्यास रावेर, यावल तालुक्यातील गुराढोरांचे चोरीच्या घटनांना आणि गोवंश हत्तेला मोठा आळा बसेल असे सर्व स्तराततून बोलले जात आहे.