Video|खिर्डी नवीन गावठाण परिसरात नागरिकांच्या घरात घुसले पावसाचे पाणी स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
खिर्डी ता.रावेर,भिमराव कोचुरे : येथे आज दुपारी 12 वाजेपासून सुरू झालेल्या परतीच्या पावसाने हजेरी लावली असून वार्ड क्र.१ मध्ये अनेक ठिकाणी पाणी साचले असून येथील गटारी मध्ये पावसाचे पाणी भरले असल्याने गावातील पावसाच्या पाण्याचा व्यवस्थितपणे निचरा होत नसल्यामुळे अनेकांच्या घरामध्ये पाणी घुसले आहे.एक ते दिड तासापूर्वी पडणार्या मुसळधार पावसामुळे पाणी साचण्याचा प्रकार घडला आहे. यामुळे नागरिकांची घरातील पाणी उपसण्यासाठी एकच तारांबळ उडाली होती. येथील भाग हा खोलगट असल्याने तसेच गटारी सुध्दा अतिशय रुंद असून हा भाग दरवर्षी पावसाच्या पाण्याने तुडुंब भरत असल्याने या समस्येला सामोरे जावे लागत आहे.
तसेच गेल्या मागील पंचवार्षिक काळात नवीन गावठाण भागात मागासवर्गीयांचा विकास निधी अंतर्गत रस्ते, व मुख्य गटारीचे लाखो रुपये खर्च करून बांधकाम करण्यात आले परंतु या ठिकाणी इस्टिमेट प्रमाणे कामे केलेली नसून नुसतीच शासनाच्या पैशाची उधळपट्टी करून निकृष्ट दर्जाचे काम करण्यात आले आहे.तसेच या भागातील मुख्य गटारीची उतरती लेव्हल नसून गावातील सांडपाणी व पावसाचे पाणी उलटे वाहत असून नागरिकांच्या घरात घुसून अनेकाची धांदल उडत असून नागरिकांचे आरोग्य सुध्दा धोक्यात येत आहे.तसेच नवीन गावठाण भागात अनेक लोक अतिक्रमण करून राहत असून त्यांना घरकुल योजनेचा अद्यापही लाभ मिळत नसल्याने हे या लोकांना सोयी सुविधांची वानवा असल्याने त्यांना मन मारून मुकाट पणे अडी अडचणींचा सामना करून आपले जीवन व्यतीत करावे लागत आहे.
तसेच खिर्डी खु येथील ग्रा.पं सदस्य यांचेकडे अतिक्रमण धारकांनी आपली काही समस्या मांडल्या असता ते या लोकांना सरळ ठणकावून सांगतात तुम्हाला कोणत्याही सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचा आमचा काही संबंध नाही तर यांना निवडणूक काळात अतिक्रमण धारक लोकांची आठवण का येते?चार चार वेळेस त्यांना भेटायला येणे आणि पाच वर्ष त्यांना तोंड न दाखवणे अशी काहीशी वृत्ती काही लोकांची असून आयत्या वेळी बिळावर नागोबा तयार असतात याची त्यांना खंत वाटली पाहिजे असा नाराजीचा सुर नागरीकांमध्ये उमटत आहे. तसेच नवीन गावठाण भागात स्थानिक प्रशासनाने काळजीपूर्वक लक्ष देवून त्वरित उपाय योजना कराव्यात अशी मागणी सुज्ञ नागरिकांनी केली आहे.