ऐंनपुर- खिर्डी परिसरात सट्टा-मटक्याचे थैमान,आशीर्वाद कुणाचा?
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
रावेर,मंडे टू मंडे,विशेष प्रतिनिधी। ऐनपुर खिर्डी परिसरात सुरू असलेल्या कल्याण वरळी, मिलन डे,मिलन नाईट, सट्टा-मटका व्यवसायामुळे आजच्या युवापिढीचे आयुष्य धोक्यात आले आहे.असे असताना सुध्दा मटका या खेळामुळे कित्येकांची घरे उध्वस्त झाल्याची उदाहरणे आहेत.काही मटका शौकीन युवकांनी घरातील भांडीकुंडी विकून मटका खेळत असल्याच्या घटना काही नवीन नाहीत.अगदी किशोरवयीन मुलांपासून तर वयोवृध्द लोकांना देखील मटक्याने भुरळ घातली आहे.
एकदा तरी आकडा लागेल आणि आपलं भाग्य उजळेल या आशेवर कित्येकांचे खिसे कायमचे रिकामे झाले आहे. कधीकाळी काही रुपयांचा आकडा लागला तर खेळाडूचा आनंद गगनात मावेनासा होतो पण महिन्याच्या शेवटी जर हिशोब केला तर आपण खेळलेले पैसे आणि आकडा खेळून मिळालेले पैसे हे नेहमी मायनस मध्येच असतात. कारण दहा घरापैकी फक्त कमी ताकदीचे घर खेळाडूंना वाटलं जात. आणि उरतात नऊ घर हि नऊ घर नक्की कोणाची त्यातलं सर्वात मोठं घर कोणाचं अजून याचा शोध लागला नाही आणि कोणीही लावण्याचा प्रयत्न पण करणार पण नाही.तरीही या धंद्याच्या नादी लागणाऱ्यांची संख्या कमी झालेली नाही. या व्यवसायाबद्दल आरडाओरड सुरू झाल्यास काही दिवसांसाठी हे व्यवसाय छुप्या पद्धतीने चालविण्यात येतात. त्यानंतर मात्र,परिस्थिती जैसे थे असते.खिर्डी बसस्थानक,बलवाडी रोड,ऐनपूर रोड, बाजारपट्टी,ऐनपूर बसस्थानक अशा खिर्डी – ऐनपूर
परिसरात ठिकठिकाणी सट्टा-मटक्याने थैमान घातले असून या खुलेआम मटका व इतर अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. मात्र असे असतानाही या पोलिस प्रशासनाकडून त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे आता जिल्हा पोलिस अधीक्षक यांनीच या गंभीर बाबीकडे लक्ष
द्यावे.