भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगावरावेर

बहुचर्चित दलित वस्ती योजनेच्या ७२ कामाच्या ई-टेंडर प्रक्रियेत घोड प्रकरणी रावेर बीडीओ ना क्लिनचीट

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

रावेर ,मंडे टू मंडे वृत्तसेवा। रावेर तालुक्यातील बहुचर्चित दलित वस्ती योजनेच्या ३४ गावांच्या ७२ कामांमध्ये ई-टेंडर प्रक्रिया नियमानुसार झाली नसल्याचे मत जिल्हा परिषदच्या चौकशी समितीने व्यक्त केले आहे. यासाठी त्यांनी सरपंच व ग्रामसेवकांवर प्रशासकीय कारवाई करण्याचे मत नोंदविले आहे. रावेरच्या बीडीओ दिपाली कोतवाल यांनी दलित वस्ती योजनेच्या कामांचा निधी वर्ग करतांना कोणतीही अनियमीतता केली नसून सर्व काही नियमानुसार २५ टक्के रक्कम संयुक्त खात्यावर वर्ग केल्याचे मत चौकशी समितीने व्यक्त केल्याने तसेच ई-टेंडरमध्ये झालेल्या घोळास क्लिन चिट दिली असून त्यांच्यावर झालेल्या आरोपातुन त्यांना क्लिनचीट मिळाली आहे.

जिल्हा परिषद सदस्य नंदकिशोर महाजन यांनी दलित वस्ती योजनेच्या कामांमध्ये अनियमितता झाल्याची व ई-टेंडर प्रक्रीयेत घोळ झाल्याची तक्रार केली होती.दलित वस्ती योजनेच्या कामांमध्ये व टेंडर प्रक्रीयेत घोळ झाल्याची तक्रार करताच नंदकिशोर महाजन यांच्या विरुध्दात मोर्चा काढण्यात आला होता. तसेच त्यांच्या गटातील कामांची चौकशी करण्याची मागणी मोर्चेकरांनी केली होती .यावर जिल्हा परिषदेने एक चौकशी समिती नेमली होती. चौकशी होऊन महिनाभराच्यावर कालावधी उलटला असता अखेर आज या प्रकरणाचा अहवाल बाहेर आला यात अनेक महत्वाचे ताशेरे चौकशी समितीने ओढले आहेत.

अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे , समाज कल्याण अधिकारी विजय रायसिंग, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब बोटे या चौकशी समितीने रावेर तालुक्यातील ३४ ग्राम पंचायतीचे सरपंच व ग्रामसेवकांवर प्रशासकिय कारवाई करण्याची शिफारस केली आहे.आता सर्व काही चौकशी समितीतुन स्पष्ट झाले असून जिल्हा परिषद सदस्य नंदकिशोर महाजन हे काय भूमिका घेतात या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!