भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेर

रावेर तालुक्यात दलित वस्ती कामाच्या ई-टेंडर ची चौकशी गुलदस्त्यात ? गूढ वाढले.

मंडे टू मंडे संकलन ।

रावेर ,मंडे टू मंडे वृत्तसेवा। रावेर तालुक्यातील ई-टेंडर व दलितवस्तीच्या कामाच्या ई-टेंडर बाबत आरोप झाल्या नंतर दलितवस्तीच्या कामांची चौकशी करण्यासाठी जिल्हा परिषदने सहा जणांची समिती गठीत केली होती,परन्तु या कामांच्या चौकशीचे पुढे काय झाले ?, या चौकशी संदर्भात कुठलीही माहिती समोर न आल्याने चौकशीबद्दल गुढ वाढले आहे.

अधिक माहिती अशी की, रावेर तालुक्यात दलितवस्तीच्या कामांच्या ई-टेंडर मध्ये नियमांची पायमल्ली झाल्याचा आरोप झाल्यावर ग्रामसेवक व गट विकास अधिकारी यांच्यावर ताशेरे ओढत जिल्हा परिषद सदस्य नंदकिशोर महाजन यांनी जि प बैठक चांगलीच गाजवली त्या मुळे चौकशी साठी समिती गठित करण्यात आली,लागलीच दुसऱ्याच दिवशी समितीने रावेर पंचायत समितीत सुमारे दहा तास कामांची व ई-टेंडरच्या कागदपत्रांची पडताळणी केली होती. या समितीला पडताळणी करून बरेच दिवस उलटले असूनही नंतर पुढे चौकशीचे काय झाले ? काहीच माहिती बाहेर न आल्याने याचे गूढ वाढले आहे.या ई-टेंडर व दलितवस्तीच्या कामांच्या चौकशी करण्यासाठी जिल्हा परिषदने उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे , सामान्य प्रशासनाचे बाळासाहेब बोटे , समाज कल्याण विभागाचे विजय रायसिंघे यांच्या सह सहा जणांची समिती नेमली होती,या समितीला चौकशी करून महीना उलटला परंतु अद्याप दोषी कोण हे बाहेर न आल्याने उत्सुकता अधिकच वाढली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!