अवैध गुटखा व्यवसाय मस्त, अन्न- औषधी प्रशासन विभागाचे अधिकारी सुस्त…
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
खिर्डी ता.रावेर(प्रतिनिधी): खिर्डी परिसरात सध्या मोठ्या प्रमाणात गुटखा विक्रीचा किरकोळ व्यवसाय करणारे व्यावसायिक आता होलसेल व्यापारी झाले असून विमल,सागर, सुगंधित सुपारी, व तंबाखूजन्य पदार्थांची किराणा दुकान ते पान टपरी पर्यंत अगदी बिनचूक पने वितरण होत असते एवढ्या मोठ्या प्रमाणात गुटखा येतो कोठून हा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
खिर्डी व आजूबाजूच्या परिसरात आज पर्यंत मोठ्या प्रमाणावर अगदी बिनबोभाट पने गुटखा विक्री सुरू असून कोणत्याच एफडीएच्या अधिकाऱ्यांना भान राहिलेले नसल्याने वर्षातून एकदाच फक्त थातुर मातुर कारवाई करण्याचा देखावा करत असतात,हप्तेखोरी वृती मुळे गुटखा व्यावसायिकांची जणू पाठराखण करण्याचा ठेकाच अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतला आहे की काय ? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. गुटखा व्यावसायिकांवर कोणत्याच अधिकाऱ्यांचे नियंत्रण नसल्याने मुजोरी वाढली आहे. सुस्त पडलेल्या एफडीए च्या अधिकाऱ्यांना आता तरी जाग येणार का .? शासनाच्या गुटखा बंद च्या घोषणा हवेतच विरल्या आहे, कितीही घोषणा केल्या तरी काही एक फरक पडत नाही.याउलट युवा वर्ग ही व्यसनाधीन होऊन अनेक प्रकारच्या कॅन्सर सारख्या आजाराने ग्रस्त होत असून बरबाद होण्याच्या मार्गावर आहे.या करिता कठोर पावले उचलण्याची गरज आहे.