“मंडे टू मंडे”चा दणका,निंभोरा येथे सांडपाणी नाल्याची ग्रामपंचायत कडून साफ सफाई
Monday To Monday NewsNetwork।
खिर्डी ता.रावेर(प्रतिनिधी)। रावेर तालुक्यातील ” निंभोरा बु.ग्रामपंचायतचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष.. घाण,दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर” या मथळ्याखाली “मंडे टू मंडे” प्रकाशित केलेल्या वृत्ताची घेतली दखल. निंभोरा बु.येथील वार्ड क्र. १ व ५ दरम्यान असलेल्या कोळी वाडा , बौद्धवाडा दरम्यान असलेल्या सांडपाणी गटारी तुडुंब भरल्या होत्या. त्यामुळे हे घाणीचे साम्राज्य पसरलेले होते.परिसरात दुर्गंधी पसरुन घाण वास येत होता.
या परिसरातील ग्रामस्थ रोहिदास तायड़े, अल्तमश खान यूनुस खान, ललित सोनार ,महेंद्र कोळी, आनंद महाले, रोशन महाले, कुणाल कोळी, मुकेश कोळी, सुभाष मोरे, प्रशांत सपकाळे, सागर महाले ,शुभम दोड़के, सोनू कोळी यासह आदिंनी ग्रामपंचायत मध्ये निवेदनाद्वारे आमरण उपोषणाचा इशारा दिला होता. तसेच रविंद्र महाले यांनीही याबाबत तक्रार केली होती. सरपंच सचिन महाले, उपसरपंच रंजना प्रशांत पाटील, व सर्व ग्राम पंचायत सदस्य, ग्रामसेवक गणेश पाटील यांनी गांर्भीयाने दखल घेत तात्काळ सर्वात मोठी असलेली मुख्य गटार व सांडपाण्याचा नाला पॉकलॅंड मशीनद्वारे नाला सफाईचे काम सुरु करण्यात आलेले आहे. कामाची पाहणी करतांना सरपंच सचिन महाले, सदस्य मनोहर तायडे, दिलशाद सर व ग्रामस्थ, सफाई कामाचे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.