भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमरावेर

खिर्डी परिसरात गुटखा व तंबाखूजन्य पदार्थाची खुलेआम विक्री– अन्न व औषधी प्रशासनाचा कानाडोळा

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

खिर्डी ता.रावेर (प्रतिनिधी): खिर्डी परिसरात सध्या मोठ्या प्रमाणात खुलेआम गुटखा, सुगंधित सुपारी, व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत असून अन्न व औषधी प्रशासन कानाडोळा करीत असून चढ्या दराने व बेकायदेशीर पने गुटखा विक्री होत असल्याने राज्य शासनाची गुटखा बंदीची अंमलबजावणी केवळ कागदापूर्तीच मर्यादित असल्याचे दिसत असून खुलेआम गुटखा विक्री कशी काय करण्यात येते, हा प्रश्न येथील जनतेला नेहमीच पडतो. मात्र याकडे खूद अन्न विभागाच्या अधिकाऱ्यांकडूनच कानाडोळा करण्यात येत आहे. 

सार्वजनिक ठिकाणी गुटखा खावून काही महाभाग पिचकाऱ्या मारून भिंतीचे कोपरे रांगविण्याचे काम अगदी बिनचूक पने करतात तर काही विचित्र मंडळी बस च्या आसना खाली गुटखा खावून पिचकाऱ्या मारलेल्याचे निदर्शनास आल्याचे दिसते. राज्य शासनाने आजच्या युवा पिढीला तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनापासून दुर ठेवण्याच्या दृष्टिकोनातून राज्यभर तंबाखू मिश्रित गुटखा,मावा सारख्या आरोग्यास हानिकारक असणाऱ्या पदार्थांवर बंदी घातली असून या गुटखा बंदी नंतर शासनाने कड्क धोरण स्वीकारत काही काळ अंमलबजाणी केली या नंतर शाळा,शासकीय कार्यालये,बस स्थानक,यांच्या पासून काही अंतरावर तंबाखू, सिगारेट,बिडी, व तत्सम तंबाखू जन्य पदार्थ विक्रीस प्रतिबंध करण्यात आला परंतु या सर्व घोषणा हवेतच विरुन गेल्या चे चित्र दिसते. त्यामुळे शासनाने केलेला कायदा कागदा पुरताच मर्यादित राहिला तर देशाचे भवितव्य असणारी युवा पिढी बरबाद झाल्या शिवाय राहणार नाही असे दिसते. बहुतांश ठिकाणी जिल्हा परिषदेच्या शाळा,महाविद्यालय परिसरात ५००मीटर अंतराच्या आत गुटखा विक्रीस बंदी असताना आज अनेक ठिकाणी खुलेआम पने विक्री केली जात आहे छोट्या मोठ्या किराणा दुकानापासून ते गोळ्या बिस्कीट च्या टपरी पर्यंत होत असलेल्या बेकायदेशीर विक्रीला आळा घालणार कोण ? या बाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

महाराष्ट्रात गुटखा विक्री बंद असताना शुल्लक पैशासाठी नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळले जात आहे. गुटखा बंदी कायद्याची उघडपणे पायमल्ली होत आहे.त्यामुळे अन्न व औषधी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या सर्व गंभीर बाबी कडे लक्ष देवून कारवाई करणे गरजेचे आहे

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!