भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरसामाजिक

खिर्डी खु येथील अतिक्रमित कुटुंबे घरकुलच्या लाभापासून वंचित…..

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

खिर्डी ता.रावेर(प्रतिनिधी): खिर्डी खु, येथील नवीन गावठाण गट नंबर १२१ मध्ये भूमिहीन,बेघर, शेतमजूर, गोरगरीब,मागासवर्गीय अशा लोकांनी सुमारे २५-३०वर्षा पासून अतिक्रमण करून झोपडी वजा कच्ची घरे बांधून रहिवास करीत आहे. शासनाकडे अनेक वेळा सामूहिक रित्या अर्ज करून ही प्रशासनाच्या ढिसाळ कार्य पद्धती मुळे अतिक्रमित कुटुंबांची गावातील काही ग्राम पंचायत सदस्यांनी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याचे नावाखाली अनेक वेळा आर्थिक फसवणूक केली आहे.उपाशी गाय आणि काटे खाय अशी परिस्थिती झालेली आहे.

ग्रामीण भागातील भूमिहीन बेघराची अतिक्रमणे नियमानुकूल करण्यासाठी राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने सुमारे दोन वर्षा पूर्वी शासन निर्णय जाहीर करण्यात आला असून अतिक्रमित कुटुंबाकडून जी रक्कम वसूल केली जाते ती बाजार भावा पेक्षाही जास्त आहे. शासनाने मोडीत काढलेल्या जुन्या गावठाण योजनेत भूमिहीन,बेघर, शेतमजुरांना एक हजार स्क्वेअर फूट जागा विना शुल्क उपलब्ध करून देण्याची तरतूद होती आता ही तरतूद संपुष्टात आली असून गावठाण क्षेत्रात राहणाऱ्या अतिक्रमित कुटुंबांना या जमिनी वरूनच अनेक वेळा हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला जातो.या कुटुंबियांना खरोखरच घरकुलाची अत्यंत आवश्यकता आहे सध्या थंडीचे दिवस असल्याने अनेकांच्या झोपडी वजा कच्च्या घराची अत्यंत दयनीय अवस्था आहे, का त्या लोकांचा जीव केव्हा निघून जाईल ते सांगता येत नाही.अशा लोकांना घरकुलाचा लाभ देताना अनेकदा प्रशासकीय यंत्रणे कडून शासन निर्देशांची पायमल्ली होत आहे.स्वतःच्या मालकीची जमीन/जागा नसल्याने लाभार्थी म्हणून पात्र असताना देखील अनेक कुटुंबांना घरकुला पासून वंचित राहावे लागते.या सर्व प्रवर्गाचे सर्वेक्षण करून घरकुलाचा लाभ देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे आजही भूमिहीन बेघर शेतमजुरांच्या डोक्यावर हक्काचे छप्पर नाही.आज पर्यंत फक्त ग्रा. पं.पदाधिकारी व ग्रामसेवक यांनी दिलेल्या पोकळ आश्वासन देत भूलथापांना बळी पडतात आज नाहीतर उद्या आपल्याला हक्काचे घर मिळेल या आशेने वाट पाहत बसले आहे.ऑफिस मध्ये एसीची थंड हवा खाणारे साहेब कधी खिर्डी खु या गावची परिस्थिती पाहण्याची तसदी घेतील का अशी संतप्त प्रतिक्रिया अतिक्रमित कुटुंबीयांनी व्यक्त केली

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!