भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यरावेर

रावेर मध्ये दंडात्मक कारवाई करणार;पालिका प्रशासन व पोलिसांची संयुक्त मोहीम

Monday To Monday NewsNetwork।

रावेर (प्रतिनिधी)। सोमवार १७ मे पासून जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखबण्यासाठी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. यासंदर्भात रावेर तहसील कार्यालयात व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेण्यात आली. यावेळी तहसीलदार उषाराणी देवगुणे, पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे, बीडीओ दीपाली कोतवाल, नगरपालिकेचे मुख्याधिकारी रवींद्र लांडे, वैद्यकीय अधिकारी डॉ.एन.डी. महाजन, डॉ. शिवराय पाटील, निंभोरा येथील सपोनि स्वप्नील उनवणे व आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.सर्वत्र कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता उद्या सोमवार पासून तालुक्यातील कडक लॉकडाऊनचे निर्बंध लागू करण्यात येणार आहे. शहरात विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई होणार आहे. गर्दी टाळण्यासाठी फळ व भाजीपाला विक्रेत्यांना नगरपालिकेने ठरवून दिलेल्या जागेव्यतिरिक्त आढळल्यास कडक दंडात्मक कारवाई येणार असल्याचा इशारा मुख्याधिकारी रविंद्र लांडे यांनी दिला आहे.

मुख्याधिकारी लांडे याचा इशारा . कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अधिक कडक प्रभावी उपाययोजना करण्यात येणार आहेत शहरातील एकाच ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी भाजीपाला व फळ विक्रेत्यांना शहरातील विविध भागात पालिकेतर्फे यापूर्वीच १५ ठिकाणी जागा निश्चित करून दिल्या आहेत. मात्र हे व्यावसायिक तेथे न बसता डॉ.आंबेडकर चौकात गर्दी करत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा विक्रेत्यांविरुद्ध सोमवारपासून पालिका प्रशासन व पोलिस विभागाची संयुक्त मोहीम राबवण्यात येणार आहे . कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेते , व्यावसायिक व नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यासह गुन्हा दाखल करण्यात येईल.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!