अभाविप जिल्ह्यातील १०० गावात तिरंगा फाड़कविणार व ५००० घरात भारत मातेचे पुजन करणार
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
रावेर,मंडे टू मंडे वृत्तसंकलन। स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे आयोजन अभाविप करीत आहे. १५ ऑगस्ट १९४७ ला आपला देश स्वतंत्र झाला. या स्वातंत्र्यासाठी अनेक स्वातंत्र्य सेनानींनी आपले बलिदान दिले. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून ७४ वर्ष पूर्ण होऊन या १५ ऑगस्ट २०२१ पासून आपण स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षात पदार्पण करीत आहोत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद देशभर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे आयोजन करीत आहे.
या अनुषंगाने एक कार्यकर्ता- एक गाव – एक तिरंगा या अभियानाचे दि. १५ ऑगस्ट २०२१ ला आयोजन केले आहे. तरी भुसावळ जिल्ह्यातील भुसावळ, रावेर, यावल,मुक्ताईनगर,बोदवड, वरंणगाव या ६ तालुक्यात १०० गावत तिरंगा फाड़कविणार आहे. तसेच ५००० घरामध्ये भारत मातेचे पुजन करणार आहे. ५३ गावमध्ये स्वातंत्र्याच्या शौर्य कथाचे आयोजन केले आहे. तसेच काही ठिकाणी रक्दान शिबिर, अश्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी आपण देखील या अभियानात आपल्या कुटुंबासह नक्की सहभागी व्हावे . असे आव्हान भुसावळ जिल्हा सयोजक अभिजीत लोणारी यांनी केले.