राज्य उत्पादन शुल्क विभागाची बेधडक कारवाई…हातभट्टी निर्मिती केंद्रांवर संक्रांत..
खिर्डी ता.रावेर/मुक्ताईनगर,मंडे टू मंडे न्युज,भिमराव कोचुरे व अक्षय काठोके। मुक्ताईनगर तालुक्यातील मानेगाव, उचंदा आणि मेळसांगवे या भागात मोठ्या प्रमाणात गावठी हातभट्टी दारू बनवली जात होती.त्या ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क विभागाची टीम बोटीने प्रवास करत मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे धाडी टाकून गावठी दारुस लागणारे रसायन व इतर मिळून २,६२,५०० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.
मिळालेल्या माहितीनुसार दिनांक ८ रोजी विभागीय निरीक्षक सुजित ओ कपाटे राज्य उत्पादन शुल्क भुसावळ जिल्हा जळगाव यांच्या पथकाने मुक्ताईनगर तालुक्यातील श्रीक्षेत्र चांगदेव येथून खाजगी बोटीने पूर्णा नदी पात्रातील मानेगाव उचंदा आणि मेळसांगवे शिवारातील बेटांवर छापे टाकून एकूण ११,९६० लि. रसायन गावठी हातभट्टी निर्मितीसाठी लागणारे इतर साहित्य व रसायने प्लॅस्टिक व पत्रिका मिळून रुपये २,६२,५०० चा मुद्देमाल मिळून आला रसायन जागीच नाश करण्यात आले. घटनास्थळी कोणताही आरोपी मिळून आला नसल्याने आरोपीचा शोध घेणे सुरू आहे सदर कारवाई विभागीय निरीक्षक सुजित ओ कपाटे राज्य उत्पादन शुल्क भुसावळ, सहायक पोलीस निरीक्षक जालिंदर साहेब, राजेश नी सोनार, दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भुसावळ अमोल भडांगे दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शक राज्य उत्पादन शुल्क सीमा तपासणी नाका तसेच विभागीय निरीक्षक पथकाचे जवान वाहनचालक सागर देशमुख, गोकुळ अहिरे, सहा दुय्यम निरीक्षक मधुकर वाघ, जवान सर्वश्री नितीन पाटील, योगेश राठोड ,अमोल पाटील, भूषण परदेशी, नंदू ननवरे, विजय परदेशी आणि पोलीस कर्मचारी गुन्हे अन्वेषण शाखा जळगाव यांनी यशस्वीरित्या पार पाडला गुन्ह्यांचा तपास निरीक्षक सुजित व कपाटे व दुय्यम निरीक्षक राजेश सोनार आणि दुय्यम निरीक्षक अमोल भडांगे हे करीत आहेत.