मुक्ताईनगर व ऐनपुर महसुल मंडळातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी
ऐनपुर/मुक्ताईनगर ,मंडे टू मंडे न्युज, प्रतिनिधी।
सलग ३ दिवस ८ डिग्री कमी तापमानामुळे सर्व शेतकऱ्यांना फळ पिक विम्याचा प्रति हेक्टर मिळणार रु.२६,५००/- लाभ मिळणार अशी माहिती आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिली.
पुर्नरचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना २०२२-२३ (आंबिया बहार) अंतर्गत दि 13 जानेवारी २०२३ पर्यंतच्या महावेध माहिती (डेटा) नुसार जळगांव जिल्ह्यातील ४९ महसूल मंडळात सलग ३ दिवस किमान तापमान ८ डिग्री सेल्सियस व त्यापेक्षा कमी राहिल्याने; जिल्ह्यातील केळीला तापमानाचा फटका बसून असेन शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे. सदर शेतकऱ्यांना रु.२६,५००/- प्रमाणे नुकसान भरपाई मंजुर झाले होते. असे असताना मुक्ताईनगर मतदार संघातील ऐनपुर व मुक्ताईनगर अशी दोघे महसूल मंडळे या नुकसान भरपाई लाभापासून वंचित राहिलेले होते. त्यामुळे दोघे महसुली मंडळातील शेतकरी वर्गात प्रचंड घबराटीचे वातावरण निर्माण झालेले होते .
या संदर्भात आमदार चंद्रकांत पाटील यांनी तातडीने विमा कंपनीचे प्रतिनिधीची यांची बैठक घेवून या दोघे महसुली मंडळात तापमानाचा पारा घसरल्याची वस्तुस्थिती असताना व वस्तुनिष्ठ पुरावे असताना सदरील दोघे मंडळे का ? अपात्र ठरविण्यात आली असा संतप्त सवाल करीत यावर सखोल चर्चा करून विमा कंपनी प्रतिनिधी व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना वस्तुनिष्ठ अहवाल शासनाकडे सादर करण्याच्या सूचना केलेल्या होत्या व यानंतर सतत पाठपुरावा करून यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या कडे ७ फेब्रुवारी रोजी मागणी करून शेतकरी बांधवांना दिलासा देण्याची मागणी केली होती.
त्यानुसार मुक्ताईनगर मतदार संघातील ऐनपुर व मुक्ताईनगर ही दोघे महसुली मंडळे विक विमा कंपनीच्या नुकसान भरपाईस पात्र ठरविण्यात आली असल्याने सलग तीन दिवस तापमानाचा पारा घसरून केळी पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा लाभ मिळणार आहे अशी माहिती आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिली.
यापूर्वी पात्र ठरलेली महसूल मंडळे खालील प्रमाणे.
.बोदवड* तालुका : बोदवड, करंजी, नाडगांव
मुक्ताईनगर तालुका : अंतुर्ली, घोडसगांव, कुऱ्हा
.रावेर तालुका : खानापूर, खिर्डी, खिरोदा, निंभोरा, रावेर, सावदा। आता नव्याने पात्र ठरलेली महसूल मंडळे —
रावेर तालुका : ऐनपूर
मुक्ताईनगर तालुका : मुक्ताईनगर