धक्कादायक ; गेम खेडू न दिल्याने तरुणांची आत्महत्या
Monday To Monday NewsNetwork।
रावेर ( प्रतिनिधी )। कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शासनाने लॉकडाऊन केले असून शाळा,कॉलेज बंद आहेत,तसेच नागरिकांना घरी राहण्याचे आवाहन केले जात असून कामाशिवाय बाहेर निघू दिले जात नाही. त्यामुळे घरात बसून लोक टीव्ही किंवा मोबाइलमध्ये व्यस्त असतात. अशातच रावेर तालुक्यातील मुंजलवाडी येथे आईने आपल्या मुलाला मोबाइलमध्ये गेम खेळू न दिल्याच्या रागावरुन मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे.
रावेर येथून जवळच असलेल्या मुंजलवाडी, ता.रावेर येथील संजय अशोक सूरदास,वय वर्ष १६ वर्ष हा घरात मोबाईलवर गेम खेळत असताना त्याच्या आईने मोबाईलवरच नेहमी खेळत राहतो काही कामधंदा कर असे म्हटले असता त्याचा मनात राग येऊन आई शेतातून येऊन आंघोळ करीत असताना सजंय ने घरातच गळफास घेतला हे लक्षात येताच संजय ला रावेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत झाल्याचे सांगितले. य मुळे परिसरात शोक व्यक्त केला जात आहे.