Murder : रावेर तालुक्यातील ऐनपूरमध्ये १३० रुपयासाठी एकाचा खून ; आरोपी फरार
ऐनपुर, ता. रावेर मंडे टू मंडे न्युज-विजय के. अवसरमल : येथिल वाल्मीक नगरात रात्रीच्या सुमारास एक तरुण फिरत असताना रामदेव बाबानगर येथील युवकाने टपरीच्या उधारीचे १३० रुपयाच्या पैशावरून वाद होऊन या वादात भिमसिंग जगदिश पवार याचे गुप्तांग पन्नालाल सोमा कोरकू याने पिरगळून टाकले त्यामुळे भिमसिंग पवार याचा जागीच मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली असून आरोपी पन्नालाल कोरकू घटनास्थळावरून पसार झाला आहे.
सविस्तर माहिती अशी की,गावांतील पन्नालाल कोरकू याची टपरी असून गुरुवार दि ५ मे च्या रात्री ८ वाजता त्या टपरीचे उधारीचे १३० रुपये भिमसिंग पवार याच्या कडे होते सदरील पैसे घेण्याच्या वादात पन्नालाल सोमा कोरकू (वय ५५) याने भिमसिगं पवार ( वय २८) याचे गुप्तांग पिरगळून टाकले यामुळे त्यास तात्काळ रावेर येथील ग्रामिण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांला मृत घोषित केले घटनास्थळावरून संशयित आरोपी पन्नालाल कोरकु पसार झाला आहे.
या घटनेची माहिती मिळताच फैजपूर विभागीय पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून आरोपीचा शोध पोलीस घेत आहे. सदर घटनेचा तपास निंभोरा पोलीस स्टेशन चे स पो नि गणेश धुमाळ याच्या मार्गदर्शनाखालील पो. हे. कॉ. ज्ञानेश्वर चौधरी स्वप्नील पाटील अब्बास तडवी हे करित असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.