भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

राजकीयरावेर

खिर्डी बू येथिल गावठाण जमिनीच्या उतारे वाटपावरून राष्ट्रवादी Vs सेना भाजपमध्ये श्रेयवादावरून जुंपली !

मंडे टू मंडे न्युज नेटवर्क |

मंडे टू मंडे न्युज डिजिटल चमू | रावेर तालुक्यातील खिर्डी बु येथिल गावठाण जमिनीवरील अतिक्रमण धारकांना उतारे वाटपावरून शिवसेना- भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असे सोशल मीडियावर श्रेयवादाची लढाई चांगलीच रंगल्याचे पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी व भाजप शिवसेना(शिंदे गट) यांच्यातील श्रेय वादाच्या आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकारण चांगलेच तापले आहे.

निवडणुकाच्या तोंडावर सद्या खिर्डी बू येथिल गावठाण जमिनीवरील अतिक्रमनाने नियमाकुलकरून लाभार्थ्यांना उतारे देण्यावरून श्रेयाची लढाई सुरू झाली असून आ. एकनाथराव खडसे यांचे समर्थक तथा माजी पंचायत समिती सदस्य दिपक पाटील यांनी खिर्डी बु ता. रावेर येथिल अतिक्रमण धारकांना वाटप झालेल्या प्लॉट चे उतारे वितरित केल्याने यावर भाजप शिवसेना शिंदे गट यांच्याकडून सोशल मीडियावर आक्षेप घेत फुकटचे श्रेय घेत असल्याचा आरोप करण्यात आल्याने श्रेय वादाला सुरुवात झाली आहे. या श्रेयाच्या राजकारणाचा सोशल वार रंगला आहे. लाभार्थ्यांना दोन्ही बाजूकडून उतारे वाटप करण्यात आल्याचे समजते.

भाजपच्या कार्यकर्त्यांचे म्हंटले आहे की, अतिक्रमण धारकांना सुमारे 3 वर्षा पुर्वी नजराना रक्कम भरून प्लाँट वाटप करण्यात आले होते. आ. चंद्रकांत पाटील यांचे माध्यमातुनच प्लाँट वाटप झाले होते असे भाजप सेनेचे म्हणने असून परंतु काही लोकांनी नजराना रक्कम न भरल्या मुळे सर्वच प्लाँट धारकांचे नावे उतारा देणे बाकी होते. याबाबत खिर्डीतील ग्रामस्थांनी तक्रार केल्या नंतर आ. पाटील व नंदु महाजन यांनी हा विषय तहसिलदारांच्या लक्षात आणुन दिल्या नंतर नजराना रक्कम भरलेल्या प्लाँट धारकांना उतारे देण्याच्या सुचना प्रशासना कडून करण्यात आल्या होत्या परंतु ते उतारे आँनलाईन काढुन या कामांचे श्रेय राष्ट्रवादी घेत असल्याचा आरोप भाजप शिवसेनेकडून करण्यात आला.

यावर आ. एकनाथराव खडसे समर्थक राष्ट्रवादीचे माजी प. स. सदस्य दिपक पाटील यांनी प्रतिउत्तर देत माहिती घेऊन बोलत जायला पाहिजे, फुकटचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न तुमचा आणी तुमच्या नेत्यांचा आहे. काही फुकटे फुकटचे श्रेय घ्यायला निघाले. नेत्यांना खुश करण्याच्या नादात तोंड घशी पडताय हे तरी लक्षात घेतले पाहिजे असे प्रतिउत्तर राष्ट्रवादीकडून देण्यात आले. विकास कामांच्या निधीवरून जिल्ह्यातील राजकारण तापले असताना खिर्डीच्या प्रकरणाने यात भर पडली असून श्रेयवादाच्या राजकारणाला चांगलाच ऊत आल्याचे पाहायला मिळत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!