सावदा परीक्षा केंद्रावर 12 वी च्या परीक्षेची बैठक व्यवस्था
सावदा,ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। इयत्ता बारावी च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेसाठी श्री आ.ग.हायस्कूल व ना.गो. पाटील कनिष्ठ महाविद्यालय सावदा परीक्षा केंद्र क्रमांक 0875 या केंद्रावर 341 परिक्षार्थ्यांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.
श्री आ.ग.हायस्कूल व ना.गो. पाटील कनिष्ठ महाविद्यालयाच्या इमारती मध्ये दालन क्र. 1 ते 14 मध्ये बैठक करण्यात आली असून शास्र शाखेच्या क्र.S074555 पासून S074699, कला शाखेचा S133092 पासून S133251, तर व्यवसाय अभ्यासक्रम शाखेच्या S162158 पासून S162196 अशी बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. याची संबंधित विद्यार्थी, पालक यांनी नोंद घ्यावी असे केंद्र संचालक श्री सी सी सपकाळे यांनी कळविले आहे.