भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेर

३२ वर्षीय युवकाची गळफास घेत आत्महत्या, रावेर ग्रामीण रुग्णालय वाऱ्यावर

मुंजलवाडी,ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज, चंद्रकांत वैदकर। रावेर तालुक्यातील मुंजलवाडी गावातील राहत असलेल्या एका आदिवासी कुटुंबातील आरीफ मजित तडवी, वय ३२ वर्ष या युवकाने दि. २३ जानेवारी रोजी सायकाळी ५ वाजेच्या दरम्यान घर आतून बंद करून आत्महत्या केली मुनाफ तडवी याने बाहेरून दरवाजा ठोठावल्यानंतर कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळत नव्हता तेव्हा घराशेजारील लोकांनी दरवाजा तोडून बघितले असता आरीफ गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत होता लोकांनी त्याला खाली उतरवून लागलीच रावेर पोलीस स्टेशनला फोन करून कळविले.

रावेर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक दिपाली पाटील , पोलीस कॉन्स्टेबल सतीश सानप घटनास्थळी दाखल झाले तसेच मुंजलवाडी गावातील सरपंच योगेश पाटील , पोलीस पाटील अनिल पाटील हे सुद्धा घटनास्थळी दाखल झाले शवाचा पोलिसांनी पंचनामा करून शव विच्छेदनासाठी रावेर ग्रामीण रुग्णालयात पाठविले असता रावेर ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर नसल्यामुळे दोन ते तीन तास शव वाऱ्यावर पडून राहिले असता त्या नंतर मुक्ताईनगर येथील डॉक्टर योगेश राणे यांना बोलवण्यात आले व शव विच्छेदन केले, युनुस तडवी यांनी दिलेल्या फिर्यादी वरून रावेर पोलीस स्टेशनला सीआरपीसी कलम १७४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिपाली पाटील पोलीस कॉन्स्टेबल सतीश सानप करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!