रावेर तालुक्यातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीस पळविले
रावेर, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। रावेर तालुक्यातील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याची घटना उघळकीस आली.या बाबत पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेली अधिक माहिती अशी की, मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूर जिल्ह्यातील मजुरी निमित्त रावेर तालुक्यातील उटखेडा येथे वास्तव्यास असलेल्या कुटुंबातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीस गुरुवार रोजी अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याने मुलीच्या वडिलांनी अज्ञाता विरोधात तक्रार दाखल केल्याने रावेर पोलिसस्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.