ऐनपूर येथील सरदार वल्लभभाई पटेल महाविद्यालयात केळी उत्पादक शेतकरी कार्यशाळा संपन्न
ऐनपुर, ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज, विजय के अवसरमल। ऐनपूर परीसर शिक्षण प्रसारक मंडळाच्या सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयात ‘केळी तंत्रज्ञान विस्तार केंद्राची’ स्थापना करण्यात आली आहे. सदर केंद्रामार्फत दि २१/११/२०२२ रोजी सकाळी ९:०० वाजता केळी उत्पादक शेतकरी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यशाळेत कार्यक्रमाचे अध्यक्ष भागवत विश्वनाथ पाटील व सर्व मान्यवरांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यशाळेला सुरुवात करण्यात आली. प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जे.बी. अंजने यांनी केले, प्रथम सत्रात प्रा. महेश महाजन, वरीष्ठ शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र,पाल यांनी केळी पिकातील रोग व्यवस्थापन या विषयावरील आपल्या मनोगतात सांगितले की जिवनात केळीला फार असे महत्व आहे केळीला जी. आय. नामांकन प्राप्त झालेला आहे जळगाव जिल्ह्यात केळीची लागवड पन्नास हेक्टर पेक्षा जास्त प्रमाणात आहे भारतात कृषी मालाची नासाडी जास्त प्रमाणात होत असल्याने पर्यावरण पुरक रोग व्यवस्थापनाची आज आपणास गरज आहे केळीची किड रोगामुळे किती पातळी खालावली आहे केळीच्या पिकांचे जिवाणू जन्य रोग, बुरशीजन्य रोग, विषाणू जन्य रोग यामुळे शेतकरी यांचे नुकसान होत आहे यावर कसे नियंत्रण करता येतील यांच्यावर सखोल अभ्यास पूर्ण मार्गदर्शन केले.
द्वितीय सत्रात प्रा. डॉ. धिरज नेहेते, शास्त्रज्ञ, कृषी उद्यान केंद्र,पाल यांनी केळी पिकाचे अन्नद्रव्य व्यवस्थापन या विषयावर तर तृतीय सत्रात श्री अमोल महाजन , मुख्य कार्यकारी अधिकारी,सिनारियो एग्रो, जळगाव यांनी केळी निर्यात या विषयावर मार्गदर्शन केले चतुर्थ सत्रात शेतकऱ्यांशी खुली चर्चा करून कार्यशाळेचा समारोप करण्यात आला कार्यशाळेला भागवत विश्वनाथ पाटील, अध्यक्ष, ऐनपूर परीसर शिक्षण प्रसारक मंडळ ऐनपूर प्रमुख पाहुणे म्हणून श्रीराम पाटील, चेअरमन, रामदास महाजन , उपाध्यक्ष, संजय पाटील, सेक्रेटरी, ऐनपूर परीसर शिक्षण प्रसारक मंडळ ऐनपूर हे उपस्थित होते सदर कार्यशाळेला परिसरातील केळी उत्पादक शेतकऱ्यांनी उपस्थिती दिली होती या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. एस एन वैष्णव यांनी केले तर आभार प्रा. एस. आर. इंगळे यांनी मानले कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ जे. बी. अंजने यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ के जी कोल्हे, डॉ एस एन वैष्णव, डॉ जे पी नेहते,प्रा. एस आर इंगळे, डॉ आर व्ही भोळे, डॉ पी आय महाजन तसेच सर्व प्राध्यापक प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले