भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरशैक्षणिक

गाते जि.प.शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

सावदा, ता.रावेर ,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। जि.प. शाळा गाते ता. रावेर जि. जळगाव येथे नुकताच इयत्ता १ ते ४ थी च्या विदयार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला.कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करून दिप प्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.योगेश प्रकाश तायडे यांची निवड केली गेली.तसेच प्रमुख पाहूणे म्हणून सरपंच सौ. सारिका गणेश पाटील व उपसरपंच सौ.अलका धनराज तायडे, सौ कविता साहेबराव कोळी हे होते.

सर्व ग्राप.सदस्य, माजी सरपंच श्री सदाशिव झांबरे, श्री.चंद्रकांत तायडे, सौ. सुनिता तायडे, सौ.रजनी पाटील , सौ. सुनिता सुनील तायडे, श्री वासुदेव पाटील , श्री कन्हैया पाटील, माजी अपसरपंच श्री. मनोज वाघ, श्री सुधीर चौधरी. श्री योगेश नारखेडे आदि मान्यवर हे उपस्थित होते.

या सर्वमान्यवरांचा शाळेच्या वतीने मुख्याध्यापक श्रीम.विद्या रविंद्र चौधरी शिक्षक सौ.माधुरी विजय चौधरी, श्री समाधान वना पाटील , श्री पंकज जिजाबराव पाटील यांनी मान्यवरांचे स्वागत व सत्कार केला. . कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदना या गीताने झाली. यावेळी पारंपारिक नृत्ये, देशभक्ती गीत. व्यसनमुक्ती नाटीका इ. गीते यांवर सहभाग घेतला.

या कार्यक्रमासाठी गावातील मोठ्या संख्येने पालकवर्ग, ग्रामस्थ, महिला यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाला हजर राहून मुलांच्या कलागुणांचे कौतूक केले प्रोत्साहन दिले. विदयार्थ्यांना बक्षिस रूपाने १२५०० रक्कम मिळाली. + लोकनृत्य सांस्कृतिक कार्यक्रमातून व्यसनामुळे होणारे नुकसान हानी याचा देखावा मांडण्यात आला, निरोगी राहण्याचे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न केला.

१४ फेब्रुवारी २०१९ ला पुलवामा हत्याकांड या घटनेला ४ वर्षे या निमित्ताने श्री. डिगंबर तायडे ( मुंबई पोलिस) यांनी शहिद झालेले जवान यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करित २ मिनिट मौन साठी सर्व ग्रामस्थ यांना स्तभ उभे राहून श्रद्धांजली अर्पित केली.

विदयार्थ्यांच्या कला-गुणांचे सर्वच स्तरातून कौतूक करण्यात आले या कार्यक्रम यशस्वीततेसाठी मुख्याध्यापक श्री विदया रविंद्र चौधरी, शिक्षक सौ.माधुरी विजय चौधरी, श्री. समाधान वना पाटील, श्री. पंकज जिजाबराव पाटील यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. माधुरी विजय चौधरी यांनी तर आभार प्रदर्शन शिक्षक श्री समाधान वना पाटील यांनी केले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!