रावेर येथील आंचल फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम अल्पदरात भोजन उपलब्ध
खिर्डी ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी। रावेर येथील आंचल फाउंडेशन तर्फे सर्वांना रु. १५ मध्ये जेवण मिळत असल्याने त्यांची सर्व ठिकाणी प्रशंसा होत आहे. आंचल फाउंडेशन तर्फे घेण्यात येत असलेल्या गोरगरीब जनतेसाठी अल्पशा दरात जेवण याचा गरिबांनीच नव्हे तर सर्वसामान्य जनतेनेलाही लाभ होवून सर्व सामान्य जनता सुद्धा देखील मनमुराद आनंद लुटत आहे. त्यामुळे आंचल फाउंडेशनला या माध्यमातून गोरगरीब जनतेने आशीर्वाद दिला आहे. विशेष म्हणजे रोज नवनवीन जेवण मिळत असल्याने कित्येक लोकांची गर्दी होत आहे.
आंचल फाउंडेशनचे हे ठिकाण बस स्टँडच्या समोर असलेले एमजे मार्केट श्रध्दा सबुरी बुट हाऊस या मागील बाजूस प्रशस्त ठिकाणी असल्याने ग्राहकांचे नेहमी गर्दी असते फाउंडेशनच्या अध्यक्ष रुकसाना तडवी, सचिव अमिन तडवी आणि संस्थेचे समन्वयक विजय कुरवारे यांच्या विचारातून हा प्रकल्प साकारला जात आहे. ही संस्था लवकरच बऱ्हाणपूर रोड, सावदा रोड, पोलीस स्टेशन परिसरात शाखांची निर्मिती करणार आहे. रावेर वासीयांना तसेच बाहेरगावातून येणाऱ्या उपाशीपोटी जनतेला भुके राहावे लागणार नाही ; असा या संस्थेचा मानस आहे. आंचल फाउंडेशन तर्फे रोज पंधरा रुपयात एक प्लेट भाजी व दोन पोळ्या हे संस्था देत आहेत. याचे सर्व कामकाज रावेर शाखा अध्यक्ष सुनील बारी यांच्या नियोजनात होत आहे.