रावेर तालुक्यातील अल्पवयीन मुलीस रावेर येथून पळविले
रावेर,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। रावेर तालुक्यातील अजनाड येथील एक शाळकरी अल्पवयीन मुलगी शाळेत प्रवेश घेण्यासाठी रावेर येथे आली असता त्या मुलीला रावेर येथून पळवून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली.
अधिक माहिती अशी की , रावेर तालुक्यातील अजनाड येथील अल्पवयीन मुलगी रावेर येथील सौ.कमलाबाई गर्ल हायस्कूल ला अकरावी मध्ये प्रवेश घेण्यासाठी आली असता तिला फूस लावून पळवून नेल्याची तक्रार मुलीच्या वडिलांनी रावेर पोलीस स्टेशनला दिली.याबाबत रावेर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास रावेर पोलीस करीत आहेत.