रावेर तालुक्यातून अल्पवयीन मुलीला पळविले
रावेर,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना रावेर शहरात घडली.
रावेर शहरात परिवारासह रहात असलेल्या १३ वर्षीय अल्पवयीन मुलीला काहीतरी आमिष दाखवत फूस लावून पळवून नेल्याची घटना दि २३ सप्टेंबर शनिवार रोजी दुपारी २ ते ३ वाजेच्या दरम्यान घडली. या बाबत मुलीच्या वडिलांच्या फिर्यादी वरून रावेर पोलिसस्टेशनला अज्ञाता विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक दीपाली पाटील करीत आहेत.